जाहिरात
दैनंदिन बातम्या

गडचिरोली: दत्तक संस्थेतील तीन बालकांचे दत्तक आदेश जाहीर

Spread the love

लोकशाही न्युज, गडचिरोली (दि. २३ सप्टेंबर)

लोककल्याण बहुउद्देशीय शिक्षण संस्था, ब्रम्हपुरी द्वारा संचालित विशेष दत्तक संस्था (SAA), बजरंग नगर गडचिरोली येथे मागील दोन वर्षांपासून कार्यरत आहे. या संस्थेत अनाथ, निराधार, बेवारस तसेच शरण आलेल्या किंवा आत्मसमर्पण केलेल्या कुटुंबातील बालकांच्या शैक्षणिक, शारीरिक व आरोग्यविषयक समस्यांचे निराकरण करण्यात येते. मानसिक व शारीरिक दृष्ट्या विकलांग बालकांचे संरक्षण व पुनर्वसन करणे हे संस्थेचे प्रमुख उद्दिष्ट आहे.

महिला व बालविकास विभाग, महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त अशी ही गडचिरोली जिल्ह्यातील एकमेव विशेष दत्तक संस्था आहे. आतापर्यंत संस्थेतील पाच बालके दत्तकपूर्व परिपोषणासाठी गेली असून त्यापैकी तीन बालकांचे दत्तक आदेश मा. जिल्हा व सत्र न्यायालय, गडचिरोली यांनी दिले आहेत.

या कार्यासाठी अ‍ॅड. सौरभ भागडे, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी अविनाश गुरनुले तसेच संस्थेचे संस्थापक पुरुषोत्तम चौधरी यांचे मार्गदर्शन लाभले आहे. संस्थेचे अधीक्षक नशिब जांभुळकर तसेच सर्व कर्मचारी वर्ग यांचा या कार्यात सक्रिय सहभाग आहे.संस्था भावी काळात अधिकाधिक निराधार व बेवारस बालकांना सुरक्षित व प्रेमळ वातावरण देऊन त्यांचे उज्ज्वल पुनर्वसन करण्यासाठी कटिबद्ध आहे.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button