जाहिरात
दैनंदिन बातम्या

कत्तलीसाठी जनावरे विक्री करणारे आरोपी जेरबंद, पोलीस स्टेशन आष्टी यांची कारवाई

५८ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त

Spread the love

लोकशाही न्युज, गडचिरोली/आष्टी (दि,२८ जुलै)

२७ जुलै ला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे आष्टी पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या कोनसरी ते जैरामपुर जंगल परिसरात नाकाबंदी करुन ४ आयसर व १ पिकअप वाहन ताब्यात घेतले. त्यावेळी त्यातील काही आरोपी जंगल परिसराचा फायदा घेवुन पळुन जाण्याचा प्रयत्न केले परंतु त्यांना ४ ते ५ कि. मी. पाठलाग करून आरोपी पकडण्यात यश आले आहे. सदर कारवाईत ५८ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून त्यामध्ये ४ आयसर व १ पिकअप वाहन व त्यामध्ये एकुण १०४ जनावरे ताब्यात घेण्यात आले.

सदर कारवाईत १) शेख अब्दुल शेख बक्शु २) शेख मोबीन (शेख ३) शेख आरीफ शेख नझीर ४) शेख आरीफ शेख बाबा ५) चंद्रशेखर गायाम या आरोपीना ताब्यात घेण्यात आले असुन त्यामधील ईतर ३ असे एकुण ८ आरोपीवर पोस्टे आष्टी येथे गुन्हा क्र. १८७/२०२३ कलम ४२९, ३४ भादवी, सहकलम ५ (अ), (१), महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम १९५५ (सुधारणा) तसेच सहकलम २, ११ (ड) प्राण्यांना निर्दयतेने वागविण्यास प्रतिबंध करण्याबाबत अधिनियम १९६० तसेच सहकलम ११९ महा. पोलिस अधिनियम १९५१ तसेच सहकलम १३०/१७७ मोटार वाहन अधिनियम १९८८ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास पोउपनिरीकक्षक अजय राठोड हे करीत आहेत.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक नीलोत्पल,अपर पोलीस अधीक्षक (अभियान) अनुज तारे,अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक अहेरी यतिश देशमुख ,उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली आष्टी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कुंदन गावडे, अजय राठोड, गणेश जंगले, येनगंटीवार, देवतळे, मडावी, जाधव, सुरवाडे, नागुलवार, रायसिडाम,पोतराजे, मंदाळे यांनी पार पाडली आहे.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button