जाहिरात
आपला जिल्हाताज्या घडामोडी

सन २०२२-२३ मध्ये ग्रामसेवकांच्या झालेल्या बदल्यांना पं.स. विकास अधिकाऱ्यांनी लावली रोख!

Spread the love

लोकशाही न्युज, गडचिरोली (दि,२८ जुलै)

गडचिरोली पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या मुरमाडी, मौशीखाब, बामणी, या ग्रामपंचायतीला लाभलेले व त्या त्या ग्रामपंचायतीला कार्यरत असलेल्या ग्रामसेवकांच्या सन २०२२ ते सन २०२३ या वर्षीय कालावधीत जिल्हा परिषद स्तरावरून जिल्ह्यातील विविध तालुका स्तरावर बदल्या होऊन आज अंदाजे दीड ते दोन वर्षाचा कालावधी लोटला जात असताना सुद्धा गडचिरोली पंचायत समितीचे संवर्ग विकास अधिकाऱ्यांनी बदल्या झालेल्या ग्रामसेवकांना अजून पर्यंत ग्रामपंचायत कार्यालयातून भारमुक्त करण्याचे धाडसच केले नसल्यामुळे बदल्या झालेले ग्रामसेवक गडचिरोली शहरात राजेशाही थाटात फिरकतांना दिसत आहेत.

सन २०२२ ते सन २०२३ मध्ये झालेल्या बदल्या मध्ये गडचिरोली सवर्ग विकास अधिकाऱ्यांनी गडचिरोली पंचायत समिती मधील कृषी विभागात कार्यरत असलेल्या गायकवाड नावाच्या कृषी अधिकाऱ्यास पंचायत समिती कार्यालयातून लगेच भारमुक्त करून त्याना भामरागड साठी रवाना करण्यात आल्याचे सांगितले जातं आहे. तर ग्रामीण स्तरावर कार्यरत असलेल्या ग्रामसेवकांना पंचायत समितीचे सवर्ग अधिकाऱ्यांनी ग्रामसेवकांना भारमुक्त का केले नाही? ही बाब सवर्ग विकास अधिकारी यांच्या प्रशासनिय कार्य प्रणालीवर संशयास्पद वाटत असल्याचे सांगितले जात आहे.

गडचिरोली जिल्हा परिषद येथे नव्यानेच रुजू झालेल्या मुख्य कार्यकारी अधिकारी आरुषी सिंग या ग्रामसेवकांच्या व इतर कार्यालयीन कर्मचाऱ्यांच्या झालेल्या बदल्यांची जातीने चौकशी करून यांना लगेच भारमुक्त करून बदली च्या ठिकाणी तात्काळ पाठविण्याची मागणी शहरात चर्चेली जात आहे.

मुख्यकार्यकारी अधिकाऱ्यांनी बदल्या झालेल्या ग्रामसेवकांचे आव्हान स्वीकारून. सवर्ग विकास अधिकाऱ्यावर कारवाई करतील काय?
संबंधित बदली झालेले ग्रामसेवक बीडीओ व विस्तार अधिकारी यांच्याशी संगणमत करून आर्थिक देवाणघेवाण करीत असल्याची चर्चा आहे त्यामुळेच बिडिओ त्यांना पाठीशी घालत असल्याची खमंग चर्चा गडचिरोली शहरात व तालुक्यात आहे .

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button