जाहिरात
ताज्या घडामोडी

गडचिरोली : विमानतळाची जागा बदलणार

सहपालकमंत्री आशिष जयस्वाल यांची पत्रकार परिषदेत माहिती

Spread the love

लोकशाही न्युज, गडचिरोली (दि. २४ जून)

शहरालगतच्या मुरखळा येथे होऊ घातलेल्या प्रस्तावित विमानतळाच्या जागेला शेतकऱ्यांचा झालेला तीव्र विरोध लक्षात घेऊन अखेर त्या ठिकाणी विमानतळा उभारण्याचा निर्णय रद्द करण्यात आला आहे. ज्या जागेला नागरिकांचा विरोध नसेल अशा नवीन जागेत हे विमानतळ उभारले जाईल, अशी माहिती सहपालकमंत्री आशिष जयस्वाल यांनी (दि. २३ जून) ला झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. सह पालकमंत्री आशिष जयस्वाल गडचिरोली जिल्हा दौऱ्यावर आले असताना ते बोलत होते.

प्रस्तावित विमानतळासाठी चार महिन्यांपूर्वी जी जागा निश्चित केली होती त्यात ६ गावांमधील ३५२ मालमत्ताधारक शेतकरी, नागरिक, ग्रामपंचायतींची जमीन जाणार होती. व खालील गावे मुरखळा, पुलखल, नवेगाव, मुडझा (बु), मुडझा (तु), कनेरी बाधित होणार होती.

जिल्हा परिषद सभागृहात झालेल्या पत्रकार परिषदेला सह पालकमंत्री आशिष जयस्वाल यांचे समवेत जि.प. सीईओ सुहास गाडे, आमदार डॉ. मिलिंद नरोटे गडचिरोली विधानसभा क्षेत्र, आमदार रामदास मसराम आरमोरी विधानसभा क्षेत्र हे हजर होते.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button