जाहिरात
क्राईम

गडचिरोली : लांझेडा वार्डात पैशाच्या वादातून ३५ वर्षीय युवकाची हत्या,आरोपी फरार

Spread the love

लोकशाही न्युज,गडचिरोली (दि. १६ मार्च)

फर्निचर तयार करायला सव्वा लाख दिलेले असताना त्या व्यक्तीने ना फर्निचर बनवून दिले ना पैसे परत दिले उलट धारदार अवजाराचे वार करत त्याचा निर्दयीपणे खुनच करून टाकला. ही थरारक आणि तेवढीच भयानक घटना गडचिरोली शहरातील लांजेडा वाॅर्डात भर दिवसा घडली.
एका ३५ वर्षीय युवकाचा निर्घृण खून झाल्याची ही धक्कादायक घटना सोमवार (दि . १६) दुपारी सुमारे ४ वाजताच्या सुमारास घडली. या घटनेमुळे संपूर्ण शहरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

सचिन रामचंद्र कोलुरवार (वय ३५) असे मृताचे नाव असून तो विवेकानंदनगर येथील रहिवासी होता. सचिन कोलुरवार हा संविधान चौक परिसरात जनरल स्टोअर चालवत होता. आरोपीचे नाव महेश बुरांडे असे असून दोघांमध्ये गेल्या काही वर्षांपासून पैशांच्या व्यवहारावरुन वाद सुरू होता. प्राप्त माहितीनुसार, सन २०१९ मध्ये सचिनने महेश बुरांडे याला सुमारे सव्वा लाख रुपये फर्निचर बनवण्यासाठी दिले होते. मात्र, महेशने ना फर्निचर तयार करून दिले, ना पैसे परत केले. त्यामुळे दोघांमध्ये वारंवार वाद होत होते. सोमवारी महेशने सचिनला लांजेडा वाॅर्डातील आपल्या घरी, जिथे तो फर्निचर बनवण्याचे काम करतो, तिथे बोलावले होते. सचिन हा आपल्या परिचित दीपक नंदेश्वर याच्यासोबत त्या ठिकाणी गेला. यावेळी दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले. पोलिस तपासात असे समोर आले आहे की, आरोपी महेश बुरांडे याने हल्ल्याची पूर्वतयारी करून ठेवली होती.

भांडणादरम्यान त्याने घराच्या आतून मिरची पावडर आणून अचानक सचिन आणि प्रत्यक्षदर्शी दीपक नंदेश्वर यांच्या अंगावर फेकली. त्यामुळे दोघे काही काळ गोंधळलेल्या अवस्थेत असताना महेशने संधी साधत फर्निचर बनवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या धारदार अवजाराने सचिनवर वार केले. या हल्ल्यात सचिन गंभीर जखमी झाला आणि त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. या घटनेचा प्रत्यक्षदर्शी साक्षीदार दीपक नंदेश्वर असून तो घटनेच्या वेळी सचिनसोबत उपस्थित होता. प्राथमिक माहितीनुसार, पैशांच्या देवाण-घेवाणीवरील वादातून हा खून झाल्याचे स्पष्ट झाले आहे. घटना घडताच आरोपी महेश बुरांडे हा घटनास्थळावरून फरार झाला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. पोलिस सूत्रांच्या माहितीनुसार, आरोपीच्या शोधासाठी विशेष पथके रवाना करण्यात आली असून लवकरच त्याला अटक करण्यात येईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button