जाहिरात
पत्रकार परिषदव्यथा

६ महिन्यापासून वेतनापासून वंचित सहाय्यक शिक्षक करणार उपोषण

Spread the love

लोकशाही न्युज, गडचिरोली (दि. २४ जून)

गोंडवाना सैनिकी विद्यालय गडचिरोली येथील सहाय्य्क शिक्षक सहा महिन्यापासून वेतनापासून वंचीत असल्याने १ जुलै पासुन कुटुंबासह उपोषण करणार असल्याची माहिती आज (दि. २४ जुन) ला झालेल्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून गणेश कार्तिक बावनकुळे या सहाय्यक शिक्षकाने दिली आहे.

गोंडवाना सैनिकी विद्यालय गडचिरोली येथून महाराष्ट्र खाजगी शाळेतील नियमावली १९८१ नियमांना बगल देत सेवाज्येष्ठता यादी डावलून अन्याय केला असल्याची माहिती दिली.

मागील सहा महिन्यापासून वेतन न झाल्याने माझे म्हातारे आई-वडील (त्यातही वडील उपचाराअभावी मरणासन्न अवस्थेत पोहचले आहेत) तसेच माझ्या दोन मुली व पत्नी, शिक्षण व कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा खर्च कुठून करावा आणि काय करावे अशी माझी दयनीय अवस्था झालेली आहे. १२ वर्षानंतर मिळणारी वरिष्ठ वेतनश्रेणीचा लाभ मला पूर्ण पात्र असूनही देण्यात आलेला नाही

तसेच माझ्यावर शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी सह. पतसंस्था गडचिरोली यांचे २५ लाखाचे कर्ज आहे. तसेच जि.डी. सी.सी बँकेचे ८. ५ लाखाचे कर्ज आहे. सहा महिन्यापासून वेतन न झाल्याने मी बँकेचे हप्तेही फेटू शकत नाही मला आर्थिक, मानसिक त्रास होत आहे.

मला वेतन मिळत नसल्याने व सेवेत रुजू करून घेत नसल्याने दि.१ जुलै २०२५ पासून कुटुंबासह शिक्षणाधिकारी (माध्यमिक) जि.प. गडचिरोली येथे आमरण उपोषण करणार असल्याची माहिती गणेश कार्तिक बावनकुळे या सहाय्यक शिक्षकाने पत्रकार परिषदेच्या माध्यमातून दिली आहे.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button