
लोकशाही न्युज, गडचिरोली (दि. २३ जून)
चामोर्शी महामार्गावरील डॉ. कुंभारे हॉस्पिटल च्या बाजूला असलेल्या स्मार्ट केअर फार्मसी मेडिकल शॉप मध्ये चोरी झाल्याची घटना उघडकीस आली आहे. चोरट्यानी मेडिकल शॉप चे कुलूप फोटून चोरीचा प्रयत्न केला व आत घुसून ड्रॉप मधील नगदी रक्कम घेऊन पसार झाले पण त्या भुरट्या चोरांचा मोठया चोरीचा प्रयत्न फसला.शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी चोरी झाल्याने पोलीसापुढे चोर शोधून काढण्याचे आव्हान आहे.
कालच्या मध्यरात्री चामोर्शी रोडवरीलच वडेट्टीवार यांच्या कॉम्प्लेक्समधील कृष्णा बेकरीचे पहाटेच्या सुमारास कुलूप फोडून चोरट्यांनी चोरी केली होती.
कालची घटना ताजी असताना आजही चोरी चा प्रयत्न झाल्याने पोलिसाच्या भूमिकेवर व कार्यक्षमतेवरही प्रश्नचिन्ह उभे झाले आहे.चोरी करणाऱ्यांच्या टोळीत दोन तरुण वयातील दोन मुले व दोन मुलींनी मिळून ही चोरी केल्याचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दिसून येत आहे.
व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण
!!
गडचिरोली शहरात चामोशी महामार्गावरील दुकानात भुरट्या चोरांनी हैदोस घातल्याने व मोठया चोरीचा प्रयत्न फसल्याने शहरातील व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण तयार झालेले आहे.
