जाहिरात
गडचिरोली पोलीसब्रेकिंग न्युजभामरागड

पोलीस व नक्षल चकमकीत १ जहाल नक्षली ठार

नक्षली साहित्य जप्त

Spread the love

लोकशाही न्युज, गडचिरोली /भामरागड (दि,१ एप्रिल)
१ एप्रिल च्या सकाळी १० वाजेच्या सुमारास उपविभाग हेडरी अंतर्गत येणाऱ्या गट्टा (जां.) हद्दीतील मौजा हिक्केर जंगल परिसरातील पहाडीवर सुमारे ६० ते ७० नक्षलवाद्यांनी जवानांना जीवे ठार मारण्याच्या व हत्यार लुटण्याच्या उद्देशाने बीजीएल व इतर दारुगोळ्याच्या साह्याने तीव्र स्वरुपात अंदाधुंद गोळीबार केला. त्यावेळी पोलीसांनी नक्षलवाद्यांना त्यांच्या हातातील शस्त्र खाली ठेवून शरण येणे बाबत आवाहन केले असता, नक्षलवाद्यांनी शरण न येता पोलीसांवर आणखी जोरदार हल्ला चढवला. जवानांनी प्रत्युत्तरादाखल व स्वरक्षणासाठी नक्षलवादयांच्या दिशेने गोळीबार केला. सदरची चकमक ही सुमारे ३० ते ४५ मिनीटे चालू होती. पोलीसांचा वाढता दबाव पाहून नक्षलवाद्यांनी घनदाट जंगलाचा फायदा घेत घटनास्थळावरून पळ काढला.

चकमकीनंतर सदर जंगल परिसरात जवानांनी शोध अभियान राबविले असता, घटनास्थळावर १ पुरुष नक्षल मृतदेह आढळून आले. मृत नक्षलीची ओळख पटली असून त्याचे नाव समीर ऊर्फ साधु लिंगा मोहंदा, वय ३१ वर्षे, रा. तुमरकोडी, पोमकें कोटी, तह. भामरागड जि. गडचिरोली येथचा रहीवासी होता.

(हेलिकॉप्टर मधून मृतक  नक्षल्याचा शव उतरवताना पोलीस प्रशासनाची टीम )

मृतक नक्षल्यावर होती खालील गुन्ह्याची नोंद
¶¶¶¶¶¶
२ चकमक व २ इतर असे ४ गुन्हे दाखल असून, त्यामध्ये पोस्टे भामरागड येथे सन २०१८ साली पोलीसांना जिवे मारण्यासाठी ॲम्बुश लावणे यासाठी देखील गुन्हा दाखल आहे. सदर नक्षल सन २०१४-१५ साली चातगाव दलममध्ये सदस्य पदावर भरती होऊन २०१७ साली प्लाटुन क्र. ७ मध्ये भास्कर चा सुरक्षा गार्ड होता. तसेच सन २०१८ साली कंपनी ४ मध्ये कार्यरत होता व त्यानंतर कंपनी क्रमांक १० मध्ये कार्यरत असल्याची प्राथमिक माहिती प्राप्त झाली आहे. त्याच्यावर महाराष्ट्र शासनाने २ लाख रुपयाचे बक्षीस जाहीर केले होते.

घटनास्थळावरून साहित्य हस्तगत
¶¶¶¶¶
१ नग देशी बनावटीची रायफल, १ नग भरमार रायफल, १ नग ३०३ रायफल, ब्लास्टींगचे साहित्य, एसएलआर च्या २ मॅगझिन व ३० राउंड्स, ८ एम. एम. रायफलचे ३ राऊंड्स, १२ बोर चे ४ राउंड्स, २ पिट्टु, भरपुर प्रमाणात नक्षल लिखाण साहित्य, १ सॅमसंग कंपनीचा टॅब्लेट, १ रेडिओ, रोख रक्कम रुपये ३८,१२०/-, नक्षल कपडे, य ईतर नक्षल साहित्य हस्तगत करण्यात पोलीस दलास यश आले .

सदर अभियान पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) अनुज तारे, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक (अहेरी) श्री. यतिश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले .

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button