जाहिरात
राजकीय

४,५,६ एप्रिल ला भाजपा शिवसेनेतर्फे जिल्ह्यात सावरकर गौरव यात्रा

भाजपा सेनेची संयुक्त पत्रकार परिषद

Spread the love

लोकशाही न्यूज गडचिरोली (दि,३१ मार्च)
३० मार्च पासून राज्य राज्यव्यापी सावरकर गौरव यात्रा महाराष्ट्रात सुरू आहे ती यात्रा ४,५,६ एप्रिल ला गडचिरोली जिल्ह्यामध्ये निघणार असल्याची माहिती गडचिरोली शहरातील स्थानिक विश्रामगृह येथे पार पडलेल्या पत्रकार परिषदेत आमदार डॉ. देवराव होळी यांनी दिली.

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या स्वातंत्र्य लढ्यातील कामगिरीचे स्मरण करून देण्यासाठी राज्यभरात ३० मार्चपासून भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेतर्फे सावरकर गौरव यात्रा काढण्यात आली आहे ही यात्रा ६ एप्रिल पर्यंत चालणार आहे नव्या पिढीला स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या कार्याची ओळख करून देण्यात येणार आहे राहुल गांधी व काँग्रेसचे अन्य नेत्याकडून सावरकरांचा वारंवार अपमान केला जात आहे सावरकरांचा अपमान करणाऱ्या काँग्रेस बरोबरची युती उद्धव ठाकरे यांनी तोडून दाखवावी असे आवाहन या माध्यमातून देण्यात येत आहे. सावरकर गौरव यात्रेचा समारोप ६ एप्रिलला चामोर्शी येथे होणार आहे

राज्यातील २८८ विधानसभा मतदारसंघातून सावरकर गौरव यात्रा प्रवास करेल 6 एप्रिल रोजी भारतीय जनता पार्टीच्या स्थापना दिनी या यात्रेचा समारोप होणार आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे तसेच भाजपा शिवसेनेचे सर्व लोकप्रतिनिधी पदाधिकारी या यात्रेत सहभागी होणार आहेत.

स्थानिक विश्रामगृहात पार पडलेल्या पत्रकार परिषदेला हेमंत जम्बेवार जिल्हा अध्यक्ष शिवसेना शिंदे गट (विधानसभा क्षेत्र गडचिरोली), प्रमोद पिपरे महामंत्री भाजपा, मुक्तेश्वर काटवे शहर अध्यक्ष भाजपा, हेमंत बोरकुटे महामंत्री भाजपा, केशव निंबोड शहर महामंत्री भाजपा आदी पदाधिकाऱ्यांची हजेरी होती.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button