गडचिरोली शहरातील ज्या नागरिकांच्या घरावरून व प्लाटमधून विद्युत तारा गेल्या आहेत त्या तात्काळ हटवा
वंचित बहुजन आघाडीची कार्यकारी अभियंत्याकडे मागणी
गडचिरोली (दि,२१ जुलै)
गडचिरोली शहरातील काही नागरिकांच्या घरावरून व प्लॉटमधून स्ट्रिट लाईटच्या विद्युत तारा गेल्या असल्याने विद्युत शॉक लागून मोठा अपघात होण्याची दाट शक्यता असल्याने शहरातील सर्वेक्षण करून ज्यांच्या घरावरून व प्लॉटमधून विद्युत तारा गेल्या आहेत त्याठिकाणचे विद्युत पोल पुढे सरकविण्यात यावे अशी मागणी वंचित बहुजन आघाडीने महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता एस एस डोंगरगावकर यांच्याकडे निवेदनातून केली आहे,
पुढे या निवेदनात म्हटले आहे की, शहराचा विस्तार मोठ्या प्रमाणात होत असून काही ठिकाणी विद्युत वितरण कंपनीने रोड मॅप न बघताच विद्युत पोल ऊभे करतांना काही नागकिकांच्या प्लाटमध्ये पोल उभे केले त्यामूळे नागकिकांना घर उभारण्यासाठी अनेक अडचणीची कसरत करावी लागत आहे तर काही नागरिकांना पर्याय नसल्याने अगदी विद्युत ताराजवळून घर उभारावे लागले आहे त्यामूळे घर बांधकाम करतांना जिवंत ताराचा स्पर्श होऊन अपघात होऊ शकते तर काही घराच्या छतावरून विद्युत तारा लोंबकळत असल्याने घराला आग लागण्याचा किंवा एखाद्याचा नकळत स्पर्श होऊन मोठा धोका होण्याची संभावना असल्याने अशा ठिकाणचे पोल विद्युत वितरण कंपनीने विनाशुल्क तात्काळ पुढे सरकवून लावावे असेही निवेदनात म्हटले आहे,
निवेदन देतांना जिल्हा्ध्यक्ष बाळू टेंभुर्णे , जिल्हा महासचिव योगेंद्र बांगरे, महिला आघाडीच्या मालाताई भजगवळी, आयटी प्रमुख संदिप सहारे, जिल्हा सदस्य संदिप गेडाम, भोजराज रामटेके, राहूल भांडेकर,सचिन मेश्राम आदि उपस्थित होते .
