जाहिरात
गडचिरोलीभामरागड

नक्षल्यांनी केली माजी सरपंचाची हत्या

Spread the love

गडचिरोली (२१जुलै)

सशस्त्र  नक्षल्यानी आज दुपारी भामरागड तालुक्यातील मन्नेराजाराम येथील एका इसमाची गळा चिरुन हत्या केली. रंगा मडावी (५०) असे मृत इसमाचे नावे आहे.
रंगा मडावी हे आज दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास मन्नेराजाराम येथून मडवेली येथे मोटारसायकलने जात असताना वाटेत नक्षल्यांनी त्यांच्यावर गोळीबार केला. यात ते जागीच गतप्राण झाले. मडावी मन्नेराजाराम ग्रामपंचायतीचे दहा वर्षे सरपंच होते.
त्यांच्या हत्येचे कारण कळू शकले नाही. दामरंचा उपपोलिस ठाण्यातील पोलिस घटनेचा तपास करीत आहेत.
एप्रिल २०२२ मध्ये मन्नेराजाराम गावाजवळच्या गेर्राटोला येथील मीना सिडाम या युवतीची हत्या करुन तिचा मृतदेह एका नाल्यात पुरण्यात आला होता. या विरोधात भामरागड तालुक्यातील आदिवासींनी मोठे आंदोलन करुन तीव्र संताप व्यक्त केला होता.
मीना सिडाम हिच्या खुनात सरपंच रंगा मडावी यांचा मुलगा अविनाश मडावी याचा हात असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर पोलिसांनीत्यास अटक केली होती. या घटनेची प्रतिक्रिया म्हणून नक्षल्यांनी रंगा मडावी यांची हत्या केली असावी, असा अंदाज आहे.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button