जाहिरात
राजकीय

केंद्र सरकारच्या दडपशाहीच्या विरोधात आम आदमी पार्टीचा राज्यभर सत्याग्रह

Spread the love

लोकशाही न्युज, गडचिरोली (दि,१६ एप्रिल)

अरविंद केजरीवाल (दिल्ली मुख्यमंत्री) यांना सीबीआय ने दिलेल्या नोटिस विरोधात आप चा राज्यभर सत्याग्रह

सीबीआयने रविवार, १६ एप्रिल रोजी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना चौकशीसाठी बोलवले असल्याने त्याचा निषेध करण्यासाठी आज आम आदमी पार्टी गडचिरोली तर्फे राज्यभर सत्याग्रह करण्यात आला. तथाकथित एक्साईज घोटाळ्याच्या चौकशीसाठी यापूर्वीच सत्येंद्र जैन यांना ताब्यात घेतलेले असताना आता अरविंद केजरीवाल यांनाही चौकशीसाठी बोलवण्यात आलेले असल्यामुळे त्याच्या विरोधात रोष व्यक्त करण्यासाठी आजचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष रंगा राचूरे यांच्या नेतृत्वात राज्यभर सत्याग्रह करण्यात आला.

दिल्लीतील जनतेला जागतिक दर्जाचे शिक्षण, आरोग्य तसेच मोफत वीज, पाणी व महिलांना मोफत प्रवास देण्याचं काम अरविंद केजरीवाल यांच्या सरकारने केलेले असल्यामुळे त्यांच्या मॉडेलला मोठ्या प्रमाणात जन मान्यता मिळत आहे. यापूर्वीच जगभर त्यांच्या कामाची स्तुती होत आहे. आता राष्ट्रीय पक्ष बनलेला आप देशभर वेगाने पसरत आहे त्यामुळेच मोदी सरकार आम आदमी पार्टीला अडचणीत आणण्याचे सर्व प्रयत्न करीत आहे.

दिल्ली विधानसभेमध्ये केजरीवाल यांनी अदानी आणि मोदी यांच्या संदर्भाने अनेक आरोप केले होते. मोदी यांच्यात काळ्या पैशाची गुंतवणूक अदानी यांच्या कंपन्यांमध्ये असल्याचा थेट आरोप केजरीवाल यांनी केला होता. तेव्हापासूनच अदानी यांना वाचवण्यासाठी केजरीवाल यांच्या विरोधात कट कारस्थान रचले जात होते, असा आरोप आपचे जिल्हा संयोजक बाळकृष्ण सावसाकडे यांनी यावेळेस केला.

मोदी सरकार तपासयंत्रणा आणि न्याययंत्रणा या दोघांच्या मदतीने त्यांच्या विरोधातील आवाज दडपण्याचं काम करीत आहे. ज्या मद्यअबकारी धोरणाचा संदर्भ घेतला जात आहे, तेच मद्य विक्री धोरण पंजाब मध्ये जसेच्या तसे लागू करण्यात आलेले असून तेथे तब्बल ४० टक्क्याहून अधिक उत्पन्न वाढले आहे. या प्रकरणांमध्ये तपास यंत्रणा अनेकांवरती दबाव आणून त्यांना हवी तशी साक्ष देण्यास भाग पाडण्याचा प्रयत्न करीत आहे. अबकारी धोरण हे निमित्तमात्र असून मोदी सरकारला केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीची धास्ती वाटत असल्यानेच हे दडपशाहीचे धोरण राबवले जात आहे. ही अघोषित आणीबाणीच आहे. त्याच्या विरोधात आणि सत्याच्या बाजूने आम आदमी पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता रस्त्यावर उतरेल असे शहर संयोजक नामदेव पोले यांनी म्हटले.

आज झालेल्या गडचिरोली येथील आंदोलनात
जिल्हा महिला संघटनमंत्री दिपिका गोवर्धन, युवा महिला संयोजक सोनल ननावरे,रघुनाथ तलाडे, प्राचार्य.नागसेन मेश्राम, छत्रपती गोवर्धन, अतुल उईके, रोहन धनघर,आकाश राऊत,आकाश हस्ते,धनराज लोखंडे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते सामील झाले होते.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button