जाहिरात
गडचिरोलीविशेष

पक्षी आणि प्राण्यासाठी चारा व पाणपोईची व्यवस्था.

सायकल स्नेही मंडळाचा नाविन्यपूर्ण उपक्रम

Spread the love

लोकशाही मराठी न्युज पोर्टल..
गडचिरोली (दि.२०) शहरातील गुरवडा रोडवरील पहिल्या नाल्याजवळ असलेल्या वृक्षाखाली आज सायकल स्नेही मंडळाच्या कार्यकर्त्यांनी सायकल रॅली काढून उन्हाळ्यातील पाण्याच्या दूर्भिक्षतेमुळे पक्षी आणि प्राणी पाण्याअभावी मृत्यूमुखी पडतात याची जाणीव ठेवून ती दूर करण्यासाठी पाॅलीथीनचा वापर करून त्यात जवळपास ६५ ते ७० लिटर पाण्याची सोय करून दिली. सोबतच पक्षासाठी चाऱ्याची सुद्धा कमतरता पडू नये म्हणून तांदूळ तथा इतर कडधान्याची पाण्याशेजारी व्यवस्था केली. पाणी साठवून ठेवण्यासाठी बी जे ट्रेडर्स चे प्रोप्रायटर्स श्री फिरोजभाई पठाण यांनी पाॅलिथीन देऊन सहकार्य केले. जी मंडळी गुरवडा रोडने सकाळी व संध्याकाळी फिरायला जाणाऱ्या पर्यावरण प्रेमींनी खाली हाताने न जाता सोबत पाण्याची बाटली घेऊन जावे व पक्षी तथा प्राण्याचे अनमोल प्राण वाचविण्यासाठी सायकल स्नेही मंडळाच्या उपक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन सायकल स्नेही मंडळाच्या वतीने करण्यात आले. यावेळी अध्यक्ष ग्रामगिताचार्य श्री बंडोपंत बोढेकर, उपाध्यक्ष तथा महा अंनिस चे सदस्य श्री विलास निंबोरकर, कार्याध्यक्ष तथा सर्पमित्र प्रा श्री विलास पारखी, सहसचिव श्री प्रमोद राऊत, सर्प मित्र श्री किशोर पाचभाई , प्राचार्य संजय नार्लावार, प्राचार्य भांडेकर, प्रा. अविनाश गौरकर, राजू बैस, बालसदस्य मोहीत देशमुख आदी उपस्थित होते. रस्त्याने ये जा करणाऱ्या प्रवाशांनी या नवोपक्रमाचे स्वागत करुन अभिनंदन मानून आभार व्यक्त केले.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button