जाहिरात
गडचिरोली पोलीसधानोरा

नक्षल्यांनी पुरून ठेवलेले स्फोटक साहीत्य हस्तगत करण्यात पोलीस दलाला आले यश

Spread the love

लोकशाही न्युज, गडचिरोली/धानोरा (१४ फेब्रुवारी)

दि. १४ फेब्रुवारी २०२३ ला ११:३० वाजताचे दरम्यान उपविभाग धानोरा अंतर्गत येत असलेल्या कटेझरी हद्दीमध्ये कटेझरी चारवाही जंगल परिसरात नक्षलवाद्यांनी पोलीस पथकांना नुकसान पोहचवून मोठा घातपात घडवून आणण्याच्या उद्देशाने मोठ्या प्रमाणात स्फोटके व इतर साहीत्य पुरुन ठेवले असल्याच्या खात्रीशीर ख़बरीच्या आधारे गडचिरोली पोलीस दलाचे जवान व बीडीडीएस पथकाचे जवान नक्षलविरोधी अभियान राबवित असतांना जवानांना जंगलात एका संशयित ठिकाणी लपवून ठेवलेले स्फोटके यांचा साठा मिळुन आला.

पोलिसांनी हस्तगत केलेले साहित्य
¶¶¶
२ नग जिवंत ग्रेनेड, २ नग ग्रेनेड फायर कफ, १८ नग वायर बंडल, ५ ब्लास्टींग स्टिल डब्बे, १ प्लॅस्टीक डब्बा (टुल किटसह), ४ नग वायर कटर, ७ नग ग्रेनेड माऊंटींग प्लेट, १ नग लहान लोखंडी आरी, २० नग नक्षल पुस्तके, ७ दु-पीन सॉकेट, १ स्टील डब्बा झाकणी व २ नग प्लॅस्टीक झिल्ली इ. नक्षल साहीत्य हस्तगत करण्यात आले.

२ नग ग्रेनेड हे बीडीडीएस पथकाच्या मदतीने अत्यंत सतर्कतेने जागेवर नष्ट करण्यात आले असून, घटनास्थळावर मिळालेल्या मुद्देमालावर कायदेशिर कारवाई करण्यात आली आहे. पुढील कारवाई गडचिरोली पोलीस दलाकडुन सुरु आहे.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button