
लोकशाही न्युज, गडचिरोली (दि,१५ फेब्रुवारी)
भारत देश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात आझादी का अमृत महोत्सव साजरा करीत आहे, मात्र गडचिरोली नगर परिषद अंतर्गत येणाऱ्या शाळेतील विद्यार्थ्यांना अद्यापही शैक्षणिक सत्र संपत असून देखील शालेय साहित्य वाटप करण्यात आले नाही ,मग नेमका आझादी का अमृत महोत्सव कशाचा असा नेमका सवाल प्रशासनापुढे पालकांनी केला आहे.

शालेय शैक्षणिक सत्र २०२२ – २०२३ या कालावधीत सत्र संपायला आला पण तरी अजूनही नगर परिषद शाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना स्कूल बॅग,बुट,सॉक्स चे वाटप करण्यात आले नाही. त्यामुळे शालेय विद्यार्थी नाखुष दिसत असल्याचे चित्र आहे. नगर परिषद च्या अनेक शिक्षकांनी यासंदर्भात प्रशासनाला अनेक पत्र व्यवहार करून सुद्धा या विषयाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करताना दिसत आहे.पालक वर्ग खूप नाराज आहे आपल्या स्वखर्चातून आपल्या पाल्याची गरज पूर्ण करीत आहेत .
नगर परिषद गडचिरोली ची सत्ता जानेवारी २०२२ ला विसर्जित झाली. नगर परीषदेत लोकप्रतिनिधी शिल्लक राहिला नाही,त्यानंतर उपविभागीय अधिकारी (SDM) प्रशासक म्हणून काम पाहत आहे.पण प्रशासकाची उदासीनता पाहून काम पूर्ण होत नसल्याचे चित्र आहे.
गडचिरोली शहरात नगर परिषद अंतर्गत जवळपास १० शाळा आहेत त्यात जवळपास हजारो विद्यार्थी,विद्यार्थिनी शिक्षण घेत आहेत पण त्या शालेय विद्यार्थ्यांना अजूनही बुट,सॉक्स,व स्कूल बॅग चे वितरण अजूनही झाले नाही.त्या शालेय वस्तूचे वितरण केव्हा होईल याकडे पालकांचे लक्ष लगले आहे .
संजय मीना,
जिल्हाधिकारी गडचिरोली
¶¶¶¶
सदर बाब ही मला आपल्यमार्फत ऐकायला मिळत आहे तरी नगर परिषद सीईओ यांना सांगून तात्काळ विषय पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार असल्याची माहिती दिली.
