लव जिहाद विरोधात आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेची निदर्शने
नागपूर (दि,२६ नोव्हेंबर) प्रतिनिधी,प्रियंका अवचट
डॉ प्रवीण तोगड़िया यांच्या निर्देशनावर आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद राष्ट्रीय बजरंग दल राष्ट्रीय महिला परिषद यांनी लव जिहाद यावर पालघर येथील श्रद्धा वासेल कर व लखनऊ मधील निधी गुप्ता विरोधात हत्याविरोधात व्हेरायटी चौक येथे निषेध आंदोलन केले. त्यावेळी संघटनेचे विदर्भ प्रभारी मोतीलाल चौधरी प्रामुख्याने उपस्थित होते व श्रद्धेच्या मारेकऱ्याला फाशी देण्याची मागणी यावेळी करण्यात आली. आंदोलना संघटनेचे विदर्भ प्रभारी मोतीलाल चौधरी यांनी अशा घटना वर आमची संघटना गप्प बसणार नाही व किती दिवस आपल्या हिंदू बहिणी मुलींना लव जिहाद मध्ये मारले जाऊ देणार? श्रद्धा चा मारेकरी आफताब ला फाशीची शिक्षा द्यावी व खटला फास्ट ट्रॅक कोर्ट मध्ये चालावा. लव जिहाद वर एकच शिक्षा देण्याचा केंद्रीय कायदा करावा सरकारने लवकरात लवकर लव जिहादवर कायदा न केल्यास संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असे मोतीलाल चौधरी म्हणाले.
याप्रसंगी संघटनेचे विदर्भ प्रांत मंत्री योगेश गायकवाड, नागपूर मंत्री प्रसाद काठी कर, राष्ट्रीय महिला परिषद विदर्भ प्रांत अध्यक्ष अस्मिता ताई भट्ट, नागपूर महिला मंत्री विनया गिरडकर, राष्ट्रीय बजरंग दल जिल्हा संपर्क प्रमुख सागर जयस्वाल, नागपूर महानगर महामंत्री भूषण गिरडकर, सहमंत्री अनिकेत मेश्राम, प्रज्वल गायकवाड भूषण खुरसंगे, धीरज ठाकूर, अनिकेत उईके, रोशन सोनटक्के, विनती तिवारी, संतोष श्रीवास्तव, आदित्य झाडे, ललित झाडे, शैलेश कामडी यांच्यासह इतर कार्यकर्ते उपस्थित होते…
