शाळा व्यवस्थापन समिती व शिक्षकांनी केला श्रमदानातून परिसर स्वच्छ

लोकशाही न्युज, चामोर्शी (दि. ९ डिसेंबर)
चामोर्शी तालुक्यातील तळोधी मोकासा गावातील वैनगंगा व पोहार नदी संगमावर पंचक्रोशीतील नागरिकांची श्रद्धा असलेल्या दागोबा या देवस्थानी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नाचणगावं ( देवळी ) येथील विद्यार्थी, पालक व शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने मुख्याध्यापक ओमप्रकाश साखरे व शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष भावीक सोनटक्के यांचे नेतृत्वात श्रमदान करून परिसर स्वच्छता करण्यात आला.
या देवस्थानी पंचक्रोशीतील भावीक मोठ्या संख्येने सहकुटुंब येऊन पूजा अर्चा करून स्नेह भोजनाचा आस्वाद घेत असतात. त्यामुळे येथे थोडया प्रमाणात अस्वच्छता पसरली होती. मात्र शाळेच्या वतीने श्रमदान करून परिसर स्वच्छ करण्यात आल्याने परिसरातील नागरिक समाधान व्यक्त करीत आहेत.
या प्रसंगी किरण बोरीकर,अरुण बारसागडे, पुरुषोत्तम सोनटक्के, धनराज लटारे, कैलास बारसागडे,प्रियंका बारसागडे, नितीशा बोईनवार, कविता लटारे, संगीता सोनटक्के,लीला बारसागडे,दीपाली सोनटक्के, प्रियंका शेट्टे, पायल कुकुडकर, इत्यादीनी सहकार्य केले. केंद्रप्रमुख माणिक वरपडे व गट समन्वयक चांगदेव सोरते यांनी प्रत्यक्ष भेट देऊन या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक केले.
