ताज्या घडामोडी
गडचिरोली : निखिल चरडे नगर परिषदेच्या उपाध्यक्षपदी
स्वीकृत नगरसेवक म्हणुन सागर निंबोरकर, सुधाकर येनगंधलवार, नंदू कायरकर यांची निवड

लोकशाही न्युज, गडचिरोली (दि. १५ जानेवारी)
गडचिरोली शहरातील प्रभाग १२ मधून प्रचंड मताधिक्याने निवडून आलेले युवा नगरसेवक निखिल चरडे यांची नगर परिषद उपाध्यक्ष म्हणून बिनविरोध निवड करण्यात आली आहे. निवडून आलेले ते सर्वात युवा नेतृत्व होते. त्यांच्या निवडीमुळे सर्व स्तरातून आनंद व्यक्त होत आहे. नगराध्यक्ष प्रणोती निबोंरकर यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन त्यांचे औपचारिक स्वागत करण्यात आले.

तसेच स्वीकृत नगरसेवकाची सुद्धा निवड करण्यात आली.यात भारतीय जनता पार्टीचे युवा नेतृत्व सागर निंबोरकर, भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ कार्यकर्ते सुधाकर येनगंधलवार, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे नंदू कायरकर यांची निवड करण्यात आली.
दि. १५ जानेवारी ला झालेल्या बैठकीत उपाध्यक्ष व स्वीकृत नगरसेवकाच्या निवडीत गडचिरोली शहरातुन निवडून आलेले सर्व नगरसेवक हजर होते.
जाहिरात
