अझिझ नाथानी ‘जिल्हा गौरव’ पुरस्काराने सन्मानित
पुरस्कार वडिलांना समर्पित- अझिझ नाथानी
लोकशाही न्युज, गडचिरोली (दि. ७ जानेवारी)
गडचिरोली अतिदुर्गम मागास जिल्ह्यात प्लॅटिनम ज्युबिली शिक्षण संस्थेच्या माध्यमातून उच्च दर्जाच्या शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणारे अझिझ हमीद नाथानी यांना गडचिरोली प्रेस क्लबतर्फे आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीदिनी दिल्या जाणाऱ्या ‘गडचिरोली जिल्हा गौरव’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा सोहळा मंगळवारी (६ जानेवारी) जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सभागृहात पार पडला.
सोहळ्याला काँग्रेसचे विधीमंडळ उपनेते आमदार विजय वडेट्टीवार, विशेष अतिथी म्हणून सहकारमहर्षी अरविंद सावकार पोरेड्डीवार, आमदार रामदास मसराम, गडचिरोलीच्या नगराध्यक्ष अॅड. प्रणोती निंबोरकर, ज्येष्ठ पत्रकार प्रदीकुमार मैत्र, जिल्हा माहिती अधिकारी गजानन जाधव, अॅड. राम मेश्राम तर सत्कारमूर्ती म्हणून प्लॅटिनम ज्युबिली शिक्षण संस्थेचे महासचिव अझिझ नाथानी व अध्यक्षस्थानी प्रेस क्लबचे अध्यक्ष मिलिंद उमरे उपस्थित होते.कार्यक्रमारंभी आमदार विजय वडेट्टीवार, सहकारमहर्षी अरविंद सावकार पोरेड्डीवार व मान्यवरांच्या उपस्थितीत अझिझ नाथानी यांना ‘गडचिरोली जिल्हा गौरव’ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
याप्रसंगी आमदार विजय वडेट्टीवार यांनी गडचिरोलीसारख्या अतिदुर्गम जिल्ह्यात इंग्रजी माध्यमाच्या शिक्षणाची सोय नसल्याने येथील मुलांना इंग्रजी शिक्षण घेता यावे, म्हणून अत्यंत परिश्रम घेत येथे सीबीएसई या इंग्रजी अभ्यासक्रमाची सुरुवात केली. त्यांच्या कार्याची दखल घेत गडचिरोली प्रेस क्लबने त्यांना पुरस्कार देऊन खऱ्या व्यक्तींचा सन्मान केला आहे. पत्रकार हे लोकशाहीचा चौथा स्तंभ असून पत्रकारांमुळे लोकशाही अजूनही जिवंतआहे. त्यामुळे पत्रकारांनी आपली लेखणी साबूत ठेवून लोकशाही बळकट करावी, असे प्रतिपादन त्यांनी केले.
याप्रसंगी सहकारमहर्षी अरविंद सावकार पोरेड्डीवार यांनी जिल्ह्यातील सामान्य माणूस अडचणीत असताना कमी संख्येत असलेल्या या समाजाने प्रत्येकाना जीवन जगण्याची दिशा दाखविली. यांनी अझिझ नाथानी सोशल क्लबमध्ये प्लॅटिनम ज्युबिली शिक्षण संस्थेचा पाया रोवला आहे. मोठ्या कष्टाने पूर्ण झालेले स्वप्न इतिहास घडवितात, अशाच इतिहास घडवत राहण्याचे आवाहन त्यांनी पुरस्कारप्राप्त अझिझ नाथानी यांना केला. तर आमदार मसराम यांनी पत्रकारितेचे महत्त्व मोठे निर्भिडपणे असून समाजात घडणाऱ्या घटना सर्वांपर्यंत पोहोचविण्याचे काम पत्रकार करीत असून पत्रकारांनी सत्यसमोर आणण्याचे काम करण्याचे प्रतिपादन त्यांनी केले. याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी समायोचित मार्गदर्शन केले.
कार्यक्रमारंभी पत्रकार दिनानिमित्त प्रेसक्लबमध्ये घेण्यात आलेल्या गीतगायन स्पर्धेतील विजेत्यांचा प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. प्रास्ताविक प्रेस क्लबचे अध्यक्ष मिलिंद उमरे तर संचालन प्रा. संध्या येलेकर यांनी तर आभार प्रदर्शन प्रेस क्लब चे उपाध्यक्ष रुपराज वाकोडे यांनी केले.
कार्यक्रमाला प्रेसक्लबचे पदाधिकारी, शहरातील गणमान्य व्यक्ती, प्लॅटिनम ज्युबिली स्कूल, तथा महाविद्यालयाचे प्राध्यापक, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीते साठी प्रेस क्लब अध्यक्ष मिलिंद उमरे, सचिव शेमदेव चाफले, उपाध्यक्ष रूपराज वाकोडे, कोषाध्यक्ष अविनाश भांडेकर, सदस्य रोहिदास राऊत, निलेश पटले, नंदकिशोर काथवटे,मनोज ताजने, सुरेश पद्मशाली, सुरेश नगराळे, विलास दशमुखे सहयोगी सदस्य विनोद बदखल, गणेश शिंगाडे, इरफान शेख, आशीष अग्रवाल, मनीष रक्षमवार, ओमप्रकाश चुनारकर, संदीप कांबळे, मनिष कासर्लावार आदींनी मोलाचे सहकार्य केले.
