३६ वा अंध कल्याण शैक्षणिक सप्ताह ८ ते १२ जानेवारीला गडचिरोलीत
राष्ट्रीय दृष्टीहीन संघ महाराष्ट्र व मैत्री परिवार संस्थेचा पुढाकार

लोकशाही न्युज,गडचिरोली (दि. ५ जानेवारी)
राष्ट्रीय दृष्टीहीन संघ महाराष्ट्र व मैत्री परिवार संस्था गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने ३६ वा अंध कल्याण शैक्षणिक सप्ताह दि. ८ ते १२ जानेवारी २०२६ ला अभिनव लॉन विद्याभारती शाळेजवळ चंद्रपूर रोड येथे साजरा असल्याची माहिती आज (दि.५ जानेवारी) ला अभिनव लॉन येथे पार पडलेल्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून देण्यात आली आहे.
या सप्ताहात महाराष्ट्रातील १५ अंध विद्यालयातील इयता १ ली ते १० वी चे विद्यार्थी सहभागी होणार आहेत. या स्पर्धेत विविध स्तरातील २७ क्रीडा प्रकार होत असून ३५० खेळाडू १०० शिक्षक सहभागी होणार आहेत.
या सप्ताहातील विविध कार्यक्रमाला आमदार डॉ. मिलिंद नरोटे, शिक्षक आमदार सुधाकर अडबले, गडचिरोली नगर परिषदेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्ष प्रणोती निंबोरकर यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे.
सहकार्याचे आवाहन
!!
या विद्यार्थ्यांच्या विविध शालेय स्पर्धाचे आयोजन होणार असून या विद्याथ्यांच्या संपूर्ण व्यवस्थेची जबाबदारी जिल्ह्यातील सामाजिक संस्था व्यक्तीक दानदाते यांच्या सहकार्याने पार पडणार आहे. विद्यार्थाना प्रवास, निवास, भोजन व बक्षिसे अश्या संपूर्ण व्यवस्थे करिता सहकार्याची आवश्यकता असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. सहकार्यासाठी संपर्क नंबर ९८२३४००८०८, ८२६२८८४१८४, ९५२७०८०९८९
गडचिरोली वासियांच्या मनोरंजनासाठी आर्केस्ट्रा
!!!
दि.१० जानेवारी २०२६ ला संध्याकाळी ६ वाजता रोशनी म्युझिकल ग्रुप नागपूर यांच्या तर्फे आर्केस्टा चे आयोजन केले आहे.
प्रभातफेरी
!!
दि. ८ जानेवारी ला सकाळी ९ वाजता गडचिरोली शहरातून प्रमुख मार्गांवरून प्रभात फेरी काढण्यात येणार आहे.
आज झालेल्या पत्रकार परिषदेला सुहास खरे अध्यक्ष राष्ट्रीय दृष्टीहीन संघ महाराष्ट्र, भोजराज पाटील उपाध्यक्ष, प्रमोद धात्रक सदस्य, निरंजन वासेकर मैत्री परिवार गडचिरोली अध्यक्ष, अविनाश चडगुलवार सचिव, अश्विनी भांडेकर महिला प्रमुख, प्रकाश मुद्दामवार हे उपस्थित होते.
