कामगारांना ग्रामपंचायत स्तरावर प्रमाणपत्र देण्यास टाळाटाळ करणाऱ्या प्रशासना विरोधात रिट याचिका दाखल करणार
पत्रकार परिषदेत अरविंद कात्रटवार यांची माहिती
लोकशाही न्युज, गडचिरोली (दि. १३ जानेवारी)
राज्य शासनाच्या वतीने बांधकाम व इतर कामरागांसाठी विविध योजना राबविण्यात येत आहेत यामध्ये सामाजिक सुरक्षा कामगारांच्या पाल्यांसाठी शैक्षणिक योजना, कामगारांसाठी आरोग्य विषय सुविधा आर्थिक पाठबळ देणाऱ्या योजनांसह लाभांच्या विविध ३८ योजनांचा समावेश आहे बांधकाम व इतर कामगार योजनांचा लाम घेण्यासाठी ग्रामपंचायत स्तरावर ग्रामसेवकांकडून प्रमाणपत्र अनिवार्य आहे कामगारांच्या कल्याणासाठी इमारत व इतर बांधकाम कामगार अधिनियम १९९६ च्या कलम ६२ च्या पोट कलम १२ चा खंड १ याद्वारे अधिकार प्रदान करण्यात आला आहे त्याअनुषंगाने १३ ऑगस्ट २०२४ रोजी राज्य शासनाने राजपत्र राजपत्राला सुध्दा काढले आहे.
परंतु गौशीखांब,मुरमाडी, भिकारमौशी, अमिर्झा जिल्हा परिषद क्षेत्रातील ग्रामसेवकांकडून कामगारांना प्रमाणपत्र देण्यास नकार देण्यात येत असल्याने हजारो कामगार योजनेच्या लाभापासून वंचीत आहेत.
याकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी ८ जानेवारी २०२६ रोजी जिल्हा परिषदेवर ३ हजार कामगारांचा महाआक्रोश मोर्चा काढण्यात आला. परंतू अद्यापही प्रशासकीय स्तरावरून कोणतीही कार्यवाही झाली नाही त्यामुळे कामगारांच्या हक्कासाठी जिल्हा परिषद प्रशासना विरोधात उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठात रिट याचीका दाखल करण्यात येणार आहे.अशी माहिती प्रेस क्लब येथे आयोजित आज (दि. १३ जानेवारी) ला झालेल्या पत्रकार परिषदेतून अरविंद कात्रटवार यांनी दिली आहे.
जेव्हा एखाद्या व्यक्तीचे मूलभूत अधिकार किंवा कायदेशीर हक्क धोक्यात येतात तेव्हा उच्च किंवा सर्वोच्च न्यायालयाकडे मदतीसाठी रिट याचीका दाखल करण्याचा संविधानिक अधिकार आहे. ज्याद्वारे न्यायालय संबंधित अधिकाऱ्याला ते हक्क बहाल करण्याचा किंवा उल्लंघन थांबवण्याचा लेखी आदेश देऊ शकते. कलम २२६ नुसार मूलभूत हक्कांच्या किंवा इतर कोणत्याही कायदेशीर हक्कांच्या अंमलबजावणीसाठी रिट याचीका दाखल करण्याचा अधिकार आहे कामगार विरोधी जिल्हा परिषद प्रशासन जर शासनाच्या राजपत्राची सुध्दा दखल घेत नसेल तर ही शासनाच्या राजपत्राची पायमल्ली आहे. त्यामुळे आता न्यायालयात दाद मागितल्याशिवाय पर्याय नाही. त्यानअनुशंगाने उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठात रिट याचिका दाखल केली जाणार आहे.
पत्रकार परिषदेला अरविंद कात्रटवार यांचेसह प्रकाश ताकसांडे, यादव लोहकरे, गोपाल मोगरकर, विनोद चापडे, यादव चौधरी, गणेश ठाकरे, सुरेश कोलते, देवेंद्र मूळे, प्रशांत ठाकूर, अमित चौधरी, प्रशांत भजगुजे, दिलीप वलादे, राजेंद्र मेश्राम यांचेसह अनेक कामगार उपस्थित होते.
