जाहिरात
देऊळगाव राजाबुलढाणा

एन डी एम जे च्या वतीने शाहू महाराजांना अभिवादन

Spread the love

सत्यकुमार ठाकूर
देऊडगाव राजा प्रतिनिधी
नॅशनल दलित मुव्हमेंट फाॅर जस्टीज (एनडीएमजे) च्या वतीने आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू जी महाराज यांच्या स्मृतिदिनानिमित्त स्थानिक फुले आंबेडकर वाटीका येथे 100 सेकंद मौन करुन अभिवादन करण्यात आले यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रशांतभैय्या डोंगरदिवे जिल्हाध्यक्ष प्रमुख मार्गदर्शक विदर्भ सचिव भारत गवई तसेच विशेष उपस्थिती विधी अधिकारी उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय मेहकर अॅड राजीव जाधव हे होते. राजर्षी शाहू महाराजांनी दिलेल्या आरक्षणाच्या मागचा उद्देश भारत गवई यांनी स्पष्ट करून दिला तसेच बाबासाहेब आंबेडकरांना शिक्षणासाठी सर्वात जास्त मदत राजर्षी शाहु महाराजांनी व सयाजीराव गायकवाड महाराज यांनी कशा पद्धतीने केली. आणी भारतीय संविधान वाचवणे कीती महत्वाचे आहे. याबाबत सविस्तर मार्गदर्शन अॅड. राजीव जाधव यांनी केले.
यावेळी रघुनाथ भंडारे, तालुका उपाध्यक्ष राजेंद्र सुरडकर, सिध्दार्थ साळवे, सुनिल साळवे, श्याम पवार, रवी राऊत, सुनिल जाधव, विलास लखाडे, हर्षवर्धन पवार, विदर्भ संघटक प्रशांत झीने, तालुका अध्यक्ष विनोद सोनटक्के, जिल्हा समन्वयक सौ आशाताई कस्तुरे, शहर अध्यक्ष संकेत जाधव यांच्यासह नॅशनल दलित मुव्हमेंट फाॅर जस्टीज (एनडीएमजे) चे समस्त पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button