जाहिरात
ब्रेकिंग न्युजसिंदेवाही

धक्कादायक ब्रेकिंग- जिप्सी उलटुन १ ठार तर ४ गंभीर जखमी

सिन्देवाही चिमुर मार्गावर शिवणी शिरकाळा येथील घटना

Spread the love

प्रतिनिधी-प्रवीन वाघे,(दि,४ ऑक्टोंबर)

सिन्देवाही तालुक्यातील चिमुर सिन्देवाही ताडोबा मार्गावर शिवणी गावाच्या पुढे आज दि ४ ऑक्टोबर ला सायंकाळच्या सुमारास जिप्सी गाडी उलटून दुर्दैवी अपघात झाला यात जिप्सीतील १ प्रवाशी जागेवरच ठार झाला तर ४ गंभीर जखमी झाले आहेत त्याना उपचारासाठी सिंदेवाही येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.


सदर सिंदेवाही तालुक्यातील शिवनी येथे आज आठवडी बाजार असतो त्यामुळे नागरिक बाजारासाठी येतात सायंकाळी परत जाण्यासाठी साधन नसल्याने खाजगी गाड्याने परत आपल्या गावाला जातात असेच शिरकाळा येथील नागरिक बाजार आटपून परत गावाला जाण्यासाठी मासळकडे जाणाऱ्या एका जिप्सीमध्ये बसले जिप्सी क्रमांक MH ३४ AM ६०३५ या प्रवासी जिप्सीने परत येत असताना शिरकाळा गावाजवळ जिप्सी पलटली दुर्दैवी अपघात झाला या अपघातात देवांगना मंगलदास बारेकर वय २० वर्षे ही मुलगी जागेवरच ठार झाली तर ४ जण गंभीर जखमी झाले यात मुलीचे आई वडील गंभीर जखमी झाले सदर घटनेची माहिती गावकऱ्यांना कळताच घटनास्थळी एकच गर्दी झाली आणि जखमींना तात्काळ सिंदेवाही येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले जखमी मध्ये मंगलदास बारेकर, चंद्रभागा मंगलदास बारेकर, सुरेखा राजाराम मडावी जखमी असून रुग्णालयात उपचार घेत आहेत सदर जिप्सी चालक हा मदनापूर येथील मनोज दोडके असल्याची माहिती मिळाली असून चालकाच्या हलगर्जीपणा मुळे हा अपघात झाला अशी चर्चा नागरिक करीत आहेत सदर घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलीस विभाग घटनास्थळी दाखल झालेअशी माहिती वृत्त लिहिपर्यंत मिळाली असून पुढील तपास सिंदेवाही पोलीस करीत आहेत.

 

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button