भाजीपाला विक्रेत्यांचा नगरपालीकेवर धडक मोर्चा.
चिखली | मेघा जाधव
( गोरगरीब भाजीपाला विक्रेत्यांना न्याय मिळवून देण्यासाठी शिवसेना शहप्रमुख विलास घोलप व नगरसेवक दीपक खरात यांच्या नेतृत्वात चिखली नगरपालिकेवर धडकला मोर्चा. )
चिखली :- गोरगरीब भाजीपाला विक्रेत्यांनी होत असलेल्या त्रासाचा निषेध नोंदविण्यासाठी शिवसेना शहर प्रमुख विलास घोलप व नगर सेवक दिपक खरात यांच्या नेतृत्वात चिखली नगरपालीकेवर धडक मोर्चा काढण्यात आला, आणि यापुढे जर असाच त्रास ह्यांना होत राहिला तर आठ दिवस आठवडी बाजार बंद करण्यात येईल असा इशारा सुधा देण्यात आला त्यावेळी उपस्थित आडते राम देशमुख,जीवन भराड,सुनील गादे,आकाश खरात,रफिक खासाब,अशोक खरात,नितीन तेलांग्रे, योगेश भराड,श्रीराम जाधव मंगेश खरात, गजानन देशमाने,अरुण देशमाने, चंद्रकांत मेहेत्रे,पवन कुठे,एजाज भाई,आरिफ भाई,राजु भराड व समस्थ भाजीपाला विक्रेते व मोठ्या प्रमाणात महिला भाजी विक्रेत्या सुद्धा उपस्थित होत्या त्यावेळी मुख्याधिकारी यांना ह्या निवेदना द्वारे अनेक मागण्या सुध्दा करण्यात आल्या त्यामध्ये जर अतिक्रमण काडायचच असेल तर पूर्ण चीखलीचे काढा वारवार भाजीपाला विक्रेत्यांना त्रास देऊ नका त्या नतर भाजीपाला विक्रेत्यांना एखादी चिखली शहरा मद्ये नियमित जागा उपलब्ध करून देणे अश्या मागण्या यावेळी ह्या निवेदना द्वारे नगरपालकेतील मुख्याधिकरी यांना करण्यात आल्या.
