जाहिरात
चिखली

रस्त्यावर फीरणारी मोकाट जनावरे हि एक भीषण समस्या

Spread the love

चिखली | मेघा जाधव
शहरात मोकाट जनावरांचा सुळसुळाट झाला असून, रस्त्यांवरील वाहनचालकांच्या डोक्यावर कायम अपघाताची टांगती तलवार असते. रस्त्यांवर आपली गुरेढोरे सोडून वाहतूक व नागरिकांना अडचण निर्माण करणाऱ्या मालकांविरुध्द नगर पालिकेने कडक कारवाई करण्याची गरज आहे. मात्र या समस्येपासून नागरिकांनी सुटका करण्यात नगर पालिका कोणतीच ठोस भूमिका घेत नसल्याने नगर पालिका हतबलता झाली आहे की काय असा प्रश्न पडतो.
शहरातील विविध रस्त्यावर ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात मोकाटे जनावरे कळपा -कळपाने फिरत आहेत तर रस्त्याच्या मध्यभागी थांबून रस्त्यावर बसत आहेत. यामुळे रहदारीस मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण होत आहे. काही रस्त्यावर अचानकपणे हे मोकाट जणावरे रस्ता ओलांडत असल्याने वाहनधारकांचे अपघात होत आहेत. तर वाहतूक कोंडीचा त्रास होत असल्याने नागरिक संतापले आहेत.

डीपीरोड परिसरात कळपच्या कळप
अत्यंत वर्दळीच्या समजल्या जाणाऱ्या डीपीरोड रोडवर गेल्या काही महिन्यांपासून मोकाट जनावरांचे वास्तव्य वाढले आहे. याठिकाणी पथदीवेच नसल्याने ही रस्त्यात बसलेली जनावरे रात्रीच्या वेळी डोकेदुखीच ठरत आहे. डीपी रोडकडून बाजाराकडे जाणारा रस्त्यावरच जनावरे ठिय्या मारून बसलेली असल्याने सकाळच्यावेळी तर अर्धा अर्धा तास ट्रॅफिक जाम होते. वीस-पंचवीस गायींचा कळप असल्याने त्यांना हुसकणे कठीण जाते. तसेच मोकाट श्वान हे मालकीचे नसल्याने प्रत्येक चौकात त्यांचे वर्चस्व वाढले आहे रात्रीच्यावेळी गस्त घालणारे पोलीस कर्मचारी व ईतर नागरीकांना त्यांनी टावा घेउन जखमी केले आहे त्यामुळे त्यांना आपले कर्तव्य बजावण्यास अतोनात अडचण निर्माण होत आहे तसेच वाहनचालकांना अर्ध्याच रस्त्याचा वापर करीत ये-जा करावी लागत असल्याने कीरकोळ अपघाताचे प्रमाण वाढले आहेत. स्थानिक नगरसेवकांनी परिसरातील अशा समस्या सोडविण्यासठी पुढाकार घ्यावा अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे. मात्र लोकप्रतिनिधींनीही या समस्येकडे दुर्लक्ष केले आहे. शिवाजी चौक राऊतवाडी स्टॉप बस स्टॅन्ड
मेन रोड व अनेक ठिकाणी
तसेच इतर भागांप्रमाणेच मोकाट जनावरांची समस्या वाढलेली असुन या नगर परिषदेने लक्ष घालावे अशी अपेक्षा नागरिक व वाहन चालक करीत आहे.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button