जाहिरात
गंगाखेडपरभणी

अखेर मुख्याधिकाऱी तथा प्रशासक वसुधा फड यांच्या हस्ते पाईपलाईनचे उदघाटन संपन्न

Spread the love

लोकशाही न्यूज पोर्टल
देवराव (बाळासाहेब) जंगले ,,गंगाखेड प्रतिनिधी(२१ सप्टेंबर)

अखेर कित्येक दिवसाने प्रलंबित असलेल्या मुख्य पाईप लाईनच्या कामाचे सुरूवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यासमोर आज मुख्याधिकारी तथा प्रशासक वसुधा फड यांच्या हस्ते नारळ फोडुन उदघाटन संपन्न झाले.


मागील कित्येक वर्षापासून प्रलंबित असलेल्या पाईपलाईनच्या कामास आज दिनांक 21 सप्टेंबर रोजी सुरुवात झाली. सततच्या पाणी लिकेज मूळे गंगाखेड शहराचा मुख्य रस्ता उकडून पांदण रस्त्याचे स्वरूप आले होते रोड होणे खूप आवश्यक होते परंतु पाईपलाईन खुप जुनी असल्यामुळे अनेक ठिकाणी लिखित होत होती त्यामुळे रोडची दुरावस्था झाली होती सततच्या होणाऱ्या लिकेजमुळे पाणीपुरवठा खंडित होवुन नागरिकांना याचा अतोनात त्रास सहन करावा लागत होता त्यामुळे ही पाईप लाईन नवीन टाकत असल्यामुळे लिकेज चा तात्पुरता प्रश्न मिटणार आहे. 75 लाख रुपये खर्चुन डॉ. आंबेडकर चौक ते दिलकश चौकापर्यंत सदरील कामास मान्यता असुन एकदा शहरातील सर्वच जिर्न झालेली पाईपलाईनचे बदलण्याची नागरीकांकडुन मागणी होत आहे यावेळी पाणी पुरवठा अभियंता मयुरी पाटील, बांधकाम अभियंता रमेश वाघमारे,अभियंते राम मुरकुटे,दिपक मुरकुटे , सागर जगतकर, स्वामी, पाणीपुरवठा सप्लायर घाडगे, रमेश साबणे, निवृत्ती व्हावळे यांची उपस्थिती होती .

 

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button