जाहिरात
चिमुरनेरी

अनुसूचित जाती व नवबौद्ध योजनेचा दुरुपयोग करणाऱ्यावर कारवाई होणार का ?

नेरी परीसरातील व नेरी वासीय नागरिकांचे लागले लक्ष : रस्त्याचा दर्जाही निकृष्ट

Spread the love

प्रतिनिधी,-प्रवीन वाघे, (दि,२१ सप्टेंबर)

चिमूर तालुक्यातील नेरी येथे नुकताच शासनाच्या अनुसूचित जाती व नवबौद्ध विकास योजनेचा दुरूपयोग केल्याचा प्रकार समोर आला.
यात नेरी येथील वार्ड क्र. 1 पेठ विभागात नंदू पाटील यांचे नावाने घर नसताना सुद्धा नंदू पाटील ते सुशीला डांगे यांचे नावाने सिमेंट काँक्रिट रोड मंजूर दाखवून बांधकाम करण्यात आले त्यातही रस्त्याच्या सुरवातीला दोन्ही बाजूला घरे नाहीत तसेच रस्त्याचे खोदकाम न करता, कोणतीही खडीकरण न करता थातुरमातुर सिमेंट काँक्रिट रोड बनवीन्यात आला त्यातही रस्त्याची उंची त्यात वापरण्यात आलेले कच्चा सिंमेन्ट काँक्रिट थर हे अत्यंत कमी आहे यामुळे रस्त्यात लाखो रुपये रफूचक्कर करण्यात आलेले असून यात मोठं मोठे बडे मासे सामील असल्याची शक्यता नागरिकांनी व्यक्त केलेली आहे.
निकृष्ट दर्जाचे काम करून लाखो रुपयाचा भ्रष्टाचार करन्यासाठी शासनाला चुकीच्या पद्धतीने दलित वस्ती दाखवून ग्रामपंचायत व त्यातही काही सदस्य हे मनमर्जीने काम करीत असल्याचा आरोप नागरिक करीत आहे. यामुळे शासनाच्या महत्वकांक्षी योजनेचा ग्रामपंचायत नेरी कडून हरताळ फासला जात आहे.
याची माहिती वृत्तपत्रात झळकताच मोठ्या मस्यांची धाकधूक वाढलेली असून अनुसूचित जाती व नवबौद्ध विकास योजनेचा दुरुपयोग करणाऱ्यांवर पंचायत समिती, जिल्हा परिषद व शासनाने कठोरपणे कारवाही करावी अशी मागणी नागरिक करीत असून यावर काय कारवाई होते याकडे नागरिकांचे लक्ष लागलेले आहे.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button