लोकशाही न्यूज पोर्टल
सुदर्शन गोवर्धन व्याहाड बूज सर्कल प्रतिनिधी (दि.20सप्टेंबर)
“राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान” अंतर्गत सध्या ग्रामीण भागात पाऊस येत असल्याने थंडीचे प्रमाण अधिक असून ताप, सर्दी,खोकला, डेंग्यू, मलेरिया,, सारख्या साथीच्या आजारामुळे मुलांचे शाळेतील हजेरीचे प्रमाण कमी होते. त्यामुळे त्यांचे शैक्षनिक नुकसान होते. हे नुकसान टाळण्यासाठी मोफत आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले.
पंचायत समिती सावली अंतर्गत असलेल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सोनापूर व सुभाचांद्रबोस हायस्कूल सोनापूर येथे दि.20सप्टेंबर रोजी सोमवारला इयता पहिली ते दहावी पर्यंतच्या सर्व विद्याथ्र्यांची आरोग्य तपासणी सावली येथील वैदयकीय अधिकारी डॉ विकास नेत्तुलवार,फार्मसिस्ट डॉ. अमरदिप पारखी तसेच श्रीमती. गौतमआरोग्य सेविका सर्व विद्याथ्र्यांची आरोग्य तपासणी केली.

या प्रसंगी जि. प. प्रा. शाळेचे मुख्याध्यापक श्री. बोधे सर, श्री काटकर सर, श्रीमती. तोडासे मॅडम, श्रीमती .मडावी मॅडम, श्रीमती विंगम मॅडम, श्रीमती बेजगमवार मॅडम, श्रीमती. पराते मॅडम, तसेच सुभाषचंद्र बोस हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री. एस.एन गिरडकर सर ,श्री. आर. एस गिरडकर सर, श्री. वैद्य सर, श्री. घोडके सर, श्री सोनुले सर, श्री खनके सर, श्री जील्हेवार सर आणि शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अथक परिश्रम करून आरोग्य तपासणी शिबीर यशस्वीरित्या पार पाडण्यास सहकार्य केले.
