जाहिरात
गंगाखेडपरभणी

अश्लील चाळे करणाऱ्या शिक्षकाला ग्रामस्थांनी दिला चोप, प्राथमिक शिक्षण अधिकारी विठ्ठल भुसारे यांची शाळेला भेट

Spread the love

लोकशाही न्यूज पोर्टल
देवराव (बाळासाहेब)जंगले
गंगाखेड प्रतिनिधी (दि,२१ सप्टेंबर)

विद्यार्थ्यी व शिक्षकाच्या नात्याला काळीमा फासणारी घटना गंगाखेड तालुक्यातील शिवाजीनगर तांडा येथील जिल्हापरिषद शाळेत घडली शिक्षकाने तीन विद्यार्थिनी सोबत अश्लील चाळे केल्यामुळे गावकऱ्यांनी सदरील शिक्षकाला चोप दिला. ही घटना घडल्यानंतर प्राथमिक शिक्षणाधिकारी विठ्ठल भुसारे यांनी शाळेला भेट देऊन शिक्षिका आणि विद्यार्थिनीच्या नातेवाईकांशी संवाद साधत सदरील शिक्षकावर कारवाई केली जाणार असल्याचे सांगितले तर शिक्षकाने विद्यार्थिनी सोबत गैरवर्तन केल्याच्या प्रकाराला त्यांनी दुजोरा दिला.
गंगाखेड तालुक्यातील शिवाजीनगर तांडा येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेवर शिक्षक म्हणून कार्यरत असणारे बी. यु. रुद्रवार या नावाच्या शिक्षकांनी शाळेमध्ये शिक्षण घेत असलेल्या तीन मुलींसोबत अश्लील चाळे केले. त्यामुळे नेहमीच्या प्रकारला वैतागलेल्या मुलींनी शिक्षक करत असलेला प्रकार आपल्या नातेवाईकांना सांगितला. त्यामुळे सोमवार 19 सप्टेंबर रोजी शिवाजीनगर तांडा येथील नागरिकांनी शाळेवर जाऊन शिक्षकाला चांगला चोप दिला.
या प्रकाराची माहिती गंगाखेडचे गटशिक्षणाधिकारी बालाजी सगट यांना देण्यात आली त्यानंतर सगट यांनी केंद्रप्रमुखांना शाळेला भेट देऊन नेमका काय प्रकार घडला आहे. याची माहिती घेण्यासाठी सांगितले तर आज मंगळवार 20 सप्टेंबर रोजी प्राथमिक शिक्षणाधिकारी विठ्ठल भुसारे यांनी शाळेला भेट देऊन अंगणवाडी सेविका शाळेतील शिक्षिका आणि मुलींच्या नातेवाईकांशी संवाद साधून घडलेल्या प्रकाराची माहिती घेतली. त्यांचे लेखी म्हणणे लिहून घेतले या प्रकाराबाबत प्राथमिक शिक्षणाधिकारी विठ्ठल भुसारे यांना विचारणा केली असता त्यांनी शिक्षकांनी मुलींसोबत गैरवर्तन केले असल्याचे सांगितले या घटनेमुळे शिक्षका पेशाला काळीमा फासणारी घटना तालुक्यात घडल्यामुळे आपल्या मुली कश्या शाळेमध्ये पाठवावीत अशी चर्चा पालकांमध्ये ऐकवयास मिळत आहे.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button