जाहिरात
गडचिरोलीब्रेकिंग न्युज

मोठी बातमी, गडचिरोली शहरातील मुख्य तलावात कुजक्या अवस्थेत सापडला तरुणाचा मृतदेह

Spread the love

गडचिरोली (दि,२० सप्टेंबर)
गडचिरोली शहराच्या मुख्यतलावात आज साधारणता ११ वाजता दरम्यान ३५ ते ४० वयोगटातील तरुणाचा मृतदेह आढळून आल्याची घटना नुकतीच उघडकीस आलेली आहे.

मृत तरुणाने निळ्या रंगाची टी शर्ट व खाकी रंगाची ठिपके असलेली हाफ पॅन्ट परिधान केली आहे .
साधारणता दोन दिवसाच्या अगोदर तलावामध्ये मृतकाने उडी मारून आत्महत्या केली असावी असा प्राथमिक अंदाज आहे, मृतदेह हा कुजक्या अवस्थेत बाहेर काढण्यात आला.

संबंधित मृतदेह पंचनामा व उत्तरीय तपासणी करिता जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोली येथे नेण्यात आलेला आहे.
संबंधित मृतदेहाची ओळख पटविण्याचे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button