जाहिरात
गडचिरोलीब्रेकिंग न्युज

नरभक्षक वाघाच्या हल्ल्यात ६५ वर्षीय इसमाचा बळी

वन विभाग नरभक्षी वाघाचा बंदोबस्त करणार कधी ?

Spread the love

गडचिरोली (दि,९ सप्टेंबर)
गडचिरोली मुख्यालयापासून २० किलोमीटर दूर करमटोला येथील नवीन तलावा जवळ (अमिर्झा) या गावी जंगलात स्वतःची गुरे चारण्यासाठी गेलेल्या इसमावर दबा धरून बसलेल्या नरभक्षक वाघाच्या हल्ल्यात कृष्णाजी महागु ढोणे ( वय ६५) या इसमाचा बळी गेला.घटना दुपारी २ वाजताच्या सुमारास झालेली आहे .


त्यांच्या मागे पत्नी, एक मुलगा, सून व नातवंड बराच आप्त परिवार आहे . परिवारावर शोककळा पसरली आहे .

वन विभाग व पोलिस प्रशासनाच्या मदतीने सदर मृतदेहाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदन करण्याकरिता गडचिरोली सामान्य रुग्णालय येथे आणण्यात आले आहे .

सदरच्या घटनेने परिसरात भीतीवरचे वातावरण पसरले असून वन विभागाच्या सूचने कडे दुर्लक्ष केल्याने अशा प्रकारच्या घटना घडत असल्याचे दिसून येत आहे .

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button