गोदाकाठी शासकीय इतमामात वीर जवान बडे यांच्यावर अंत्यसंस्कार
हवेत तीन वेळा बंदुकीचे करून दिली मानवंदना
गंगाखेड प्रतिनिधी (दि,९ सप्टेंबर)
सिकंदराबाद येथे ए.सी.बी नाईक सुभेदार या पदावर कार्यरत असणाऱ्या परभणी जिल्ह्यातील गंगाखेड तालुक्यातील पांढरगाव येथील वीर जवान विष्णू व्यंकोबा बडे वय वर्ष 38 यांचे दिनांक 7 सप्टेंबर रोजी दुपारी चार वाजता निधन झाले.
विष्णू बडे या वीर जवानावर गंगाखेड शहरातील गोदाकाठी दिनांक 9 सप्टेंबर रोजी शासकीय ईतमामात बंदुकीचे हवेत तीन फायर करून मानवंदना देण्यात आली आहे.

विष्णू बडे यांचा पार्थिव विशेष गाडीने औरंगाबाद मार्ग
गंगाखेडला् आणण्यात आले. विष्णू बडे राहत असलेल्या बंजारा कॉलनी परिसरातील विशाल नगर येथील त्यांच्या घरापासून त्यांची अंत्ययात्रा सकाळी ठीक नऊ वाजता
वाजत गाजत ,फटाक्याची अतिशबाजी करत डॉ. आंबेडकर, चौक ,अहिल्याबाई होळकर चौक, दिलकस चौक ,जनाबाई मंदिर मार्गे गोदाकाठी आणण्यात आले. त्यांच्या पार्थिवास त्यांचे सुपुत्र यांच्या हस्ते अग्नी देण्यात आला.

महाराष्ट्र पोलीस दलाच्या वतीने हवेत तीन वेळा फायर करून मानवंदना देण्यात आली पांढरगाव येथील भूमिपुत्र यांना वीरमरण आल्याने गावासह गंगाखेड तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात होती.
बडे परिवार आई, वडील, पत्नी एक मुलगा ,एक मुलगी भाऊ-बहीण नातेवाईक दुखातून लवकरात लवकर बाहेर पडावेत त्यांना ईश्वर शक्ती देवोत अशी अशा यावेळी व्यक्त करण्यात आली.
राजकीय मंडळी, माजी सैनिक , प्रशासकीय अधिकारी उपजिल्हाधिकारी सुधीर पाटील, सहाय्यक पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा, तहसीलदार गोविंद यरमे, गटविकास अधिकारी अंकुश चव्हाण, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील माने, माजी नगराध्यक्ष रामप्रभुजी मुंडे, पांढरगाव चे सरपंच, गावातील मंडळी ,नातेवाईक मोठ्या संख्येने या अंत्यसंस्कारास उपस्थित होते .