जाहिरात
गडचिरोलीब्रेकिंग न्युज

९ हजाराची लाच घेतांना विक्रमपूर येथील सरपंच एसीबी च्या सापळ्यात

Spread the love

गडचिरोली (दि,२ सप्टेंबर)
जिल्हयातील चामोर्शी तालुक्यातील विक्रमपूर येथील सरपंच घरकुल योजनेत नाव नोंदवून घरकुलाचा लाभ मिळवून देण्याकरिता ९ हजारांची लाच स्विकारतांना एसीबीच्या जाळयात अडकला आहे. श्रीकांत सत्यनारायण ओल्लालवार (४६) रा. चामोर्शी असे लाचखोर सरपंचाचे नाव आहे. सदर कारवाईने ग्रामपंचायत प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे.

प्राप्त माहितीनुसार, तक्रारदाराचे घरकुल योजनेत नाव नोंदवून घरकुलाचा लाभ मिळवून देण्याकरिता सरपंच श्रीकांत सत्यनारायण ओल्लालवार यांनी १० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. मात्र तक्रारदार यांना लाच रक्कम देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग कार्यालयात तक्रार दाखल केली. तक्रारीची शहानिशा करुन सापळा रचला असता चामोर्शी येथील राहत्या घरी तडजोडीअंती ९ हजार रुपयांची लाच स्विकारतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. याप्रकरणी पोलीस स्टेशन चामोर्शी येथे भ्रष्टाचार प्रतिबंध कायदयान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर कारवाई ला.प्र.वि गडचिरोलीचे पोनि शिवाजी राठोड, पोनि श्रीधर भोसले, पोहवा नथ्थु धोटे, पोना राजेश पदमगिरवार, पोना श्रीनिवास संगोजी, पोशि संदीप उडाण, मपोशि ज्योत्सना वसाके, चापोहवा तुळशिराम नवघरे यांनी केली आहे.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button