जाहिरात
आरमोरी

नगरपालिकेने प्रत्येक कर धारक कुटुंबाला ओला आणि सुका कचरा संकलनासाठी मोफत डस बिन चे वाटप करावे. नगर सेवक मिलींद खोब्रागडे.

Spread the love

आरमोरी (दि, २६ ऑगष्ट)
स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी आवश्यक उपाययोजना नगरपालिकेकडून केल्या जात आहेत मात्र, सर्वेक्षणात ओला वा सुका कचरा फुटपाथ विक्रेत्यांनी, व्यावसायिकांनी, नागरिकांनी, घरातून वेगळा करून देण्याबाबत निर्देशे दिले आहेत. परंतु आरमोरी शहरातील कचरा प्रश्न दिवसेंदिवस चिघळत आहे नगरपरिषेकडून मोठ्या प्रमाणात उपाययोजना राबविल्या जात असल्या, तरी पालिकेला सामान्य नागरिकांकडून अपेक्षित पणे ओला आणि सुका कचरा अलग करून मिळत नसल्याचे चित्र दिसून येत आहे.
ओला व सुका कचऱ्याचे वर्गीकरण पार पाडता यावे यासाठी शहरातील प्रत्येक कर धारक कुटुंबाला ओला आणि सुका कचरा जमा करण्याकरिता नगरपरिषदेने मोफत डस बिन चे मोफत वाटप करावे.
त्याचप्रमाणे शहरातील व्यापाऱ्यांना, छोटे-मोठे दुकान आणि पान टपरी चालकांना सुद्धा डसबीनचे वाटप करण्यात यावे. त्याचबरोबर ओला कचरा आणि सुका कचऱ्याचे वर्गीकरण कसे करायचे यासंबंधी मार्गदर्शन सूचना द्यावे त्यामुळे दारात येणाऱ्या घंटागाड्यांच्या कर्मचाऱ्यांचा वर्गीकरण साठी लागणारा वेळ वाचेल आणि कचरा इतरत्र टाकण्यापेक्षा नागरिक त्या दिलेल्या डस बिन मध्ये टाकतील. मेंन मार्केट च्या भागातुन दररोज दोनदा सफाई करावी.


त्यासोबतच नगरपालिकेने काही घंटागाड्या चे पत्रे जीर्ण झाल्याने किंवा भंगारले असल्याने त्यांची तात्काळ दुरुस्ती करावी घंटागाडी टाकलेला कचरा हा खाली पडत असून रस्त्यावर पसरत असतो त्यामुळे तात्काळ त्यांची दुरुस्ती करावी.
अशी मागणी नगरसेवक मिलींद खोब्रागडे यांनी पत्रकातुन केलेली आहे.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button