जाहिरात
गंगाखेड

कर्तव्यदक्ष मुख्याधिकारी तथा प्रशासक वसुधा फड यांच्या मार्गदर्शनाखाली वसुली मोहीम जोमात तर अतिक्रम धारक कोमात

आजच्या वसुली मोहीमे मध्ये एकुण तिन दुकानदारांचे दुकान सील करण्यात आले

Spread the love

गंगाखेड प्रतिनिधी (दि,२६ ऑगष्ट)

गंगाखेड नगर परिषदेच्या वतीने विशेष वसुली मोहीम हाती घेण्यात आली असून यामध्ये 31 मार्च 2022 पर्यंत ज्या दुकानदारांकडे जास्तीची थकबाकी आहे त्यांच्याकडून वसुलीसाठी नगरपरिषदेच्या कर्तव्यदक्ष मुख्याधिकारी तथा प्रशासक वसुधा फड व त्यांचे सहकारी /कर्मचाऱ्यांनी यांनी विशेष वसुली मोहीम हाती घेत आज एकूण तीन दुकानांना सील लावले असून हि अतिक्रमण मोहीम शंभर टक्के वसुली पर्यंत चालू राहणार आहे.


मुख्याधिकारी वसुधा फड यांनी 31 मार्च 2022 रोजी नोटीसीव्दारे थकबाकी भरण्यास सांगितले असता भाडेधारकांनी थकित असलेले भाडेपट्टी रक्कम भरली नसल्यामुळे दिनांक २४ ऑगस्ट २०२२ पासुन विशेष वसुली मोहीम मुख्याधिकारी वसुधा फड यांनी आपल्या सहकारी अधिकारी व कर्मचारी यांच्या सह ताफा एक ट्रॅक्टर, जेसीबी मशीन, घंटा गाडी व स्वच्छता विभागातील कर्मचारी यांच्या साहाय्याने वसुली मोहीम चालू केली असून नगरपरिषदेच्या व्यापार संकुलातील तीन गाळ्यांना मुख्याधिकारी वसुधा फड यांनी स्वतः सील केले असुन या तीन गाळाधारक दुकानदारांकडे एकुण 36 हजार, दुसऱ्या दुकानदाराकडे 48 हजार,व तिसऱ्या दुकानदाराकडे एक लाख 78 हजार पाचशे रुपये अशी नगरपरिषदेची भाड्यापोटी थकीत रक्कम असल्याने दुकानधारकांच्या गाळ्यांना सील लावण्यात आले तर उर्वरित थकबाकी धारक दुकानदारांना पुढील दोन दिवसाची मुद्दत देण्यात आली असून या विशेष वसुली मोहिमेत नऊ लाखांच्या वर वसुली करण्यात आली आहे. या वसुली मोहिमेत नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी तथा प्रशासक वसुधा फड यांच्या मार्गदर्शनाखाली उपमुख्याधिकारी स्वाती वाकोडे, अभियंता वाघमारे ,लेखापाल रमेश मणियार, वसुली अधिकारी सुरेश मणियार, मुकुंद कोकड, स्वच्छता निरीक्षक शिवाजी हजारे, स्वच्छता सुपरवायझर जालिंदर गायकवाड, अमोल जगतकर, व अन्य कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

फळ विक्रेते गाडीवाले व ऑटो वाले यांना नियोजित जागा उपलब्ध करून दिल्यामुळे व्यापारामध्ये समाधानाचे वातावरण आहे.


या विशेष वसुली मोहिमे सोबतच गंगाखेड बाजारपेठेमध्ये 50 फुट एवढा मोठा रस्ता असताना देखील वाहतुकीची वारंवार कोंडी होत असल्यामुळे या रस्त्यावर अतिक्रमित फळ विक्रेत्यांना नगरपरिषदेच्या वतीने जागा नियोजित करून देऊन त्या जागेच्या व्यतिरिक्त दुसऱ्या जागेवर हातगाडा किंवा फळ विक्रीचे दुकान लावले तर त्यांना दंड ठोकण्यात येईल असे आदेश मुख्याधिकारी यांनी दिले आहेत. अनधिकृत वावर , बेशिस्त ऑटो चालकांना व्यवस्थित ऑटो पार्क करण्यासाठी पार्किंग ची सोय करून दिल्यामुळे वाहतुकीची कोंडी सुटल्याने गंगाखेड व्यापाऱ्यांच्या वतीने समाधान व्यक्त करण्यात येत आहे. या मोहिमेसोबत गंगाखेड शहरातील मुख्य रस्ता हा भाजी मुंडे पर्यंत मर्यादित न ठेवता दिलकश चौकापर्यंतचे अतिक्रमण धारकांना देखील अतिक्रमण काढायला सांगावे असे व्यापाऱ्यांमध्ये कज बुज चालू आहे.
या विशेष वसुली मोहिमे सोबतच अतिक्रमण मोहीम गंगाखेड नगरपरिषदेच्या वतीने राबविण्यात येत असल्यामुळे अतिक्रमण करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button