जाहिरात
गडचिरोलीब्रेकिंग न्युज

शेतकऱ्यांने केली गळफास घेत आत्महत्या गडचिरोली शहरानजीकच्या मुडझा येथील घटना

Spread the love

गडचिरोली (दि,१५ ऑगष्ट)

जिल्हा मुख्यालयापासुन ६ किलोमीटर अंतरावर असलेल्या मुडझा येथे पुरपिडित शेतकऱ्यांने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना दिंनाक १४ ऑगस्ट रविववारी संध्याकाळच्या सुमारास घडली.

बंडू नामदेव चौधरी वय ४९ वर्ष रा. मुडझा ता.जि गडचिरोली असे गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या मृतक शेतकऱ्याचे नाव आहे.

बंडु नामदेव चौधरी यांना चार एकर शेती असुन सततच्या पुरामुळे चार वेळा पिक पाण्याखाली गेल्याने त्याचे फार मोठे नुकसान झाले.झालेला खरच कसा भरुन काढायचा या आर्थिंक विवंचनेमुळे त्याने आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज आहे. घटनेनंतर गडचिरोली पोलीस घटनास्थळी पोहचुन पंचनामा केला असुन याचा पुढील तपास करीत आहेत.त्याच्या मृत्यू पच्छात पत्नी, १ मुलगा व १ विवाहीत मुलगी व बराच आप्त परिवार असुन त्यांच्या कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे .

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button