जाहिरात
गडचिरोलीराजकीय

भारतीय जनता पार्टी गडचिरोली तर्फे भव्य तिरंगा रथयात्रा

Spread the love

मा.खा.श्री. अशोकजी नेते यांच्या नेतृत्वात भव्य बाईक रॅली शहरातील कारगिल चौक गडचिरोली येथे संपन्न…

गडचिरोली (दिं.१३ ऑगस्ट)

स्वातंत्र्याच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त भव्य बाईक रॅलीचे कारगिल चौक गडचिरोली येथे आयोजन करण्यात आले.हि बाईक रॅली या क्षेत्राचे खा.अशोकजी नेते यांच्या न नेतृत्वाखाली भव्य तिरंगा रथ यात्रेचा शुभारंभ भारत मातेच्या जयघोषाने सुरु करून या बाईक रॅली ची सुरुवात खा.अशोकजी नेते यांनी रॅलीमध्ये बाईकस्वार होऊन भारत माता की जय अशा जयघोषाने हिरवी झेंडी व तिरंगा दाखवून सुरूवात करण्यात आली.
या बाईक रॅलीत भाजपासह सर्व मोर्चाचे आघाड्यासह सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे पूर्ण झाली.आणि त्यामुळेच आज आपण स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अतिशय आनंदाने, उत्साहाने आणि देशभक्ती ने प्रेरित होऊन साजरा करीत आहोत.
आपल्या ध्वजाचा अधिक सन्मान करण्यासाठी आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत भव्य बाईक रॅली काढण्यात आली.
याचे औचित्य साधून कारगिल चौक येथून गडचिरोली शहरातून,गांधी चौक इंदिरानगर.रेडीगोडाऊन,गोकुल नगर,आय.टि.आय चौक,एलआयसी ऑफिस, कोर्ट,कॉम्प्लेक्स,शेवट खासदार साहेबाच्या भाजपा ऑफिसमध्ये समारोप करण्यात आले.

या बाईक रॅलीमध्ये ३०० बाईक रॅलीनी सहभाग घेतला.

याप्रसंगी खा.अशोकजी नेते गडचिरोली-चिमुर लोकसभा क्षेत्र तथा भाजपा राष्ट्रीय महामंत्री अनु.जनजाती मोर्चा,प्रकाश गेडाम प्रदेश सरचिटणीस संघटन भाजपा एस.टी मोर्चा, गोविंद जी सारडा जिल्हा महामंत्री, प्रशांत वाघरे जिल्हा महामंत्री, रवींद्र औलालवार जिल्हा महामंत्री,प्रमोद पिपरे जिल्हा महामंत्री,चांगदेव फाये जिल्हाध्यक्ष भाजपा युवा मोर्चा, रेखाताई डोळस प्रदेश सदस्या महिला आघाडी मोर्चा,रमेश बारसागडे किसान आघाडीचे जिल्हाध्यक्ष, रमेशजी भुरसे प्रदेश सदस्य,भारत खटि जिल्हा उपाध्यक्ष, अरून हरडे माजी उपाध्यक्ष, विलास देशमुखे माजी उपसभापती,संजय बारापात्रे जिल्हा सरचिटणीस युवामोर्चा,योगिताताई पिपरे माजी नगराध्यक्ष, योगिताताई भांडेकर माजी जि.प.अध्यक्षा, विलास पा.भांडेकर ता.संपर्कप्रमुख, वसंतराव कुलसंगे,अनिल पोहनकर,अनिल कुनघाडकर माजी न.प उपा.विजय शेडमाके शहर अध्यक्ष आदिवासी आघाडी, मुक्तेश्वर काटवे शहर अध्यक्ष, सागर कुमरे युवा शहर अध्यक्ष, गिताताई हिंगे,वैष्णवी नैताम,रशमी बानमारे,भारती सरोदे,निताताई उंदिरवाडे,सलीमभाई अल्पसंख्याक, अलिताई,पठाण ताई,वछलाताई मुनघाटे,पुष्पाताई करकाडे, रंजीता कोडाप माजी.सभापती.विजय कुमरे,तसेच अनेक भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button