ध्वज विक्री केंद्राचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशिर्वाद जिल्हा परिषद गडचिरोली यांच्या हस्ते उदघाटन
गडचिरोली (दि,८ ऑगष्ट)
भारतीय स्वातंत्र्याला ७५ वर्षे पुर्ण होत असल्याच्या पार्श्वभुमीवर देशात सर्वत्र “आजादी का अमृत महोत्सव” साजरा केला जात आहे. त्याचाच एक भाग म्हणुन जिल्हा परिषद, गडचिरोली कडुन मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, मा. श्री. कुमार आशीर्वाद यांचे मार्गदर्शनाखाली दिनांक ९ ते १७ ऑगष्ट २०२२ या कालावधीत “स्वराज्य महोत्सव” अंतर्गत विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. त्यानुषंगाने सदर उपक्रमांची आज पासुन सुरुवात झाली. आज जिल्हा परिषद, गडचिरोलीचे मा. मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. कुमार आशीर्वाद यांचे हस्ते ध्वज विक्री केंद्राचे उद्घाटन महाराष्ट्र राज्य ग्रामीण जिवनोन्नती अभियान अंतर्गत जलधारा प्रभाग संघ येथे करण्यात आले.
“हर घर झेंडा” या उपक्रमांतर्गत प्रत्येक कुटुंबाला भारतीय राष्ट्रध्वज सहजरित्या उपलब्ध व्हावा याकरीता जिल्हा परिषद, प्रशासनाकडुन महाराष्ट्र राज्य ग्रामीण जिवनोन्नती अभियान, गडचिरोली येथे राष्ट्रध्वज उपलब्ध करुन देण्यात आलेले आहेत.
सदर कार्यक्रमाचे उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहूने म्हणून श्री. राजेंद्र एम भुयार, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प. गडचिरोली हे होते. या प्रसंगी श्री. शेखर शेलार, उप मुख्य कार्यकारी अधिकारी, श्री. रविंद्र केमसे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत), श्री. ओंकार अंबपकर, मुख्य लेखा तथा वित्त अधिकारी, श्री. ललीत होळकर, कार्यकारी अभियंता (बांध), श्री. अमित तुरकर, कार्यकारी अभियंता (ग्रा.पा.पु.), श्रीमती ए.के. इंगोले, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (म.व.बा.क), श्री. पि. झेङ तुमसरे, जिल्हा कृषी विकास अधिकारी आदीसह सर्व विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाचे नियोजन जिल्हा अभियान व्यवस्थापक श्री. प्रफुल्ल भोपये व त्यांचे विभागातील सहकारी यांनी केले.
