बुलढाणा
कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या
लोणार (दि,८ ऑगष्ट)
सततची नापीकी, अवकाळी पाऊस व कर्जबाजारीपणाला कंटाळून विठोबा संपत नागरे वय ४२ वर्ष रा. चिखला काकड तालुका लोणार सकाळी ११ वाजता आत्महत्या केल्याचे आढळून आले.
सकाळी जेवण करून वर माडीवर झोपायला जातो असे पत्नीला सांगून तो वर माडीवर गेला व तेथे असलेल्या दोराने गळफास घेतला त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला त्याच्या मरणानंतर त्याच्या कुटुंबात त्याची पत्नी व एक मुलगा व २ मुली आहेत त्याच्या निधनानंतर त्यांच्या परिवारावर फार मोठी शोककळा पसरली आहे.
पोलीस घटनास्थळावर पोहचून पंचनामा करून बीबी ग्रामीण रुग्णालयात मृतदेह शवविच्छेदनासाठी हलविण्यात आलेला आहे.
जाहिरात