गडचिरोली (दि८ ऑगस्ट )
घरो घरी तिरंगा अभियानांतर्गत भारतीय जनता पार्टी गडचिरोली शहराची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न
१५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत स्वातंत्र्य झाला तेव्हा सर्वसामान्य जनतेमध्ये प्रचंड आनंद झाला. आनंदाने तिरंगा ध्वज लहरवित त्यांनी अती उत्साहाने हा सण साजरा केला. आज त्याला ७५ वर्ष पुर्ण होत आहेत. हे स्वातंत्र्याचे अमृत महोत्सव आहे आपल्या नविन पिढीला त्या स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या वीरांचे स्मरण व्हावे या स्वातंत्र्याचे महत्व समजावे याकरिता संपूर्ण देशात प्रत्येक घरावर तिरंगा ध्वज सन्मानपूर्वक फडकवून स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यात येत आहे. आपल्याही गडचिरोली शहरातील प्रत्येक घरावर तिरंगा ध्वज फडकवन्यासाठीआपण सर्वांनी प्रयत्न करावेत असे आवाहन आमदार डॉ देवरावजी होळी यांनी घरो घरी तिरंगा अभियानांतर्गत भारतीय जनता पार्टी गडचिरोली शहराच्या महत्त्वपूर्ण बैठकीच्या प्रसंगी केले.
यावेळी मंचावर खासदार अशोकजी नेते, जिल्हा महामंत्री प्रमोदजी पिपरे, शहराध्यक्ष मुक्तेश्वरजी काटवे, माजी नगराध्यक्षा सौ योगीताताई पिपरे, किसान आघाडीचे प्रदेश कार्यकारणी सदस्य रमेश जी भूरसे , भाजपा जिल्हा सचिव गीताताई हिंगे, माजी न प उपाध्यक्ष , अनिल कुनघाडकर, युवा मोर्चाचे शहराध्यक्ष सागर कुंभरे, गोवर्धनजी चव्हाण, प्रामुख्यानं उपस्थित होते.
यावेळी दिनांक १३ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट दरम्यान होणाऱ्या तिरंगा यात्रेच्या संदर्भामध्ये युवा मोर्चाचे शहर महामंत्री अनिल तिडके यांनी बैठकीतील उपस्थिताना विस्तृत माहिती दिली.
भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेतृत्त्वावर विश्वास ठेवून भावनाताई उत्तम हजारे रामनगर, पायलताई श्रीकांत कोडापे आटीआय परिसर, प्रा. अरुण प्रसाद ऊराडे गोकुळनगर, संगीताताई कुळमेथे, कौशल्याताई बंजारा, शेखर गडसुलवार यांनी भारतीय जनता पार्टी मध्ये प्रवेश केला.
यावेळी नवोदित भाजपा प्रवेश करणाऱ्या कार्यकर्त्यांचे आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी भाजपाचा दुपट्टा गळ्यात टाकून पक्षात स्वागत केले व त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
