म्हसलीच्या जिल्हा परीषद शाळेत जातांना काय तो गाळण, काय तो कचरा, शाळेत गेल्यावर काय त्या भेगा एकदम ओक्केमध्येच.
सांभाळून रे दोस्ता शाळेत जाताना आणि वर्गात धोका होऊ शकतो .
उपसरपंच म्हनतो कोन होय रे तो शाळेची तक्रार करनारा. सांग बर त्याच नाव
म्हसली ग्रामपंचात उपसरपंच.
प्रतीनीधी-प्रवीण वाघे,
मो,7038115037
चिमुर (दि,७ ऑगष्ट)
चिमूर तालुक्यातील मसली येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची दैयनीय अवस्था झाली आहे. या इमारतीच्या आवारात पाऊसाचे पाणी साचलेले आहे त्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेत जाताना मोठा त्रास सहन करून हाजरी लावावी लागत आहे, याठिकाणी सर्वत्र पाणी साचून तलाव झाल्याचे चित्र दिसत आहे, त्याच प्रमाणे शाळेतील भिंतीमध्ये मोठे मोठे भेगा पडल्याने विंचू साप येण्याची शक्यता नाकारता येत नाही, त्यामुळे विद्यार्थ्यां च्या जीवास धोका होण्याची शक्यता आहे.
तरी या संदर्भात पालकांनी शाळा व्यवस्थापक समिती यांना माहिती देऊनही दुर्लक्ष केल्या जात होते, या संदर्भात विद्यार्थ्यांच्या पालकांनी प्रहार सेवक प्रवीण वाघे व सामाजिक कार्यकर्ते विलास पिसे यांना तक्रारी केल्या होत्या त्या अनुषंगाने प्रहारसेवक प्रवीण वाघे सामाजिक कार्यकर्ता विलास पिसे यांनी मसली गावातील शाळेला भेट देऊन या संदर्भात गावातील सरपंच व उपसरपंच व शाळा व्यवस्थापन समिती यांना बोलावून चर्चा केली रस्त्यावर मुरूम टाकण्याची मागणी केली, तरी शाळेतील परिसरात २ दिवसात मुरूम न टाकल्यास प्रहार संघटनेकडून लोटांगण आंदोलन करण्यात येईल असा इशारा प्रहारसेवक प्रवीण वाघे व सामाजिक कार्यकर्ते विलास पिसे यांनी दिला होता दोन म्हसली ग्रामपंचातनी दिवसात शाळेच्या आवारातल पाणी काढन्याचा प्रयत्न केला.आणी आजही परीस्थीती जैसें थे आहे सरपंच उपसरपंच या॓नी खोटे आश्वासन देऊन शा॓त बसले आहेत.याचा अर्थ रडु नको ऊगा राय अशी असणारी परीस्थीती आहे. जंगलात एवढा कचऱ्याचा एवढा वास्तव नाही तेवढा म्हसलीच्या जिल्हा परीषद शाळेत दिसुन येतो. सा॓भाळुन रे दोस्ता शाळेत जाता॓ना आणी वर्गात धोका होऊ शकतो. अशी म्हनायची वेळ आली आहे.
याबाबत काही दिवसापुर्वी म्हसली येथे विविध समस्साबाबत बैठक लावण्यात आली.मात्र समस्सा मार्गी लावन्याचा विषय भरकवटत म्हसली ग्रामपंचात उपसरपंच प्रमोद खोब्रागडे या॓नी त प्रहार सेवकाला प्रश्न विचारला कोन होय रे तो तुमच्या कडे तक्रार करणारा सांग बर त्याच नाव हार टाकुन स्वागतच करतो. म्हनजे याचा अर्थ असा की शाळेत विविध समस्सा असुन विद्यार्थ्यांसोबत खेळ खंडोबा चालु असता॓ना हा उपसरपंच तक्रार दाराच नाव विचारुन स्वागत करतो म्हनतो नेमकी या उपसरपंचाच्या बुद्धीला म्हनाव तरी काय खरच गावच्या उपसरपंचाला विकासाची तळमळ आहे की स्वागताची असा प्रश्न निर्माण झाला आहे.त्यामुळे आता प्रहार संघटना प्रशासन व म्हसली ग्रामपंचात विरुद्ध आक्रमक होऊन आंदोलनाची भुमीका घेऊन विद्यार्थिना न्याय मिळवुन देईल असे सा॓गीतले आहे.
