जाहिरात
गडचिरोलीराजकीय

खोट्या सह्यांची मोहीम राबवून भाजपाला निवडणूकित पराभूत करणाऱ्या प्रवृत्ती पासून सावधान

आमदार डॉ. देवराव होळी यांचे पत्रकार परिषदेतून जनतेला आवाहन

Spread the love

लोकशाही न्युज, गडचिरोली (दि,१८ सप्टेंबर)

गडचिरोली विधानसभा क्षेत्रातील माझे विरोधक मला विधानसभेची उमेदवारी मिळू नये याकरिता मोठ्या प्रमाणावर खोट्या सह्या दाखवून माझ्या विरोधात अपप्रचार करीत आहेत. लोकांकडून खोट्या सह्या करून घेत वरिष्ठ पातळीवर माझ्या विरोधात षडयंत्र करीत आहेत अशा सह्यांचा आधार घेऊन खोटे बोलून पक्षाची व जनतेची फसवणूक करीत आहेत त्यामुळे अशा लोकांपासून सावध राहावे अशी माहिती आज स्थानिक इंदिरा गांधी चौकातील रेस्ट हाऊस येथे गडचिरोली ऑल मीडिया असोसिएशनच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेतून आमदार डॉ. देवराव होळी यांनी केली आहे.

पत्रकार परिषदेला आमदार डॉ. देवराव होळी यांचे सह प्रमोद पिपरे समन्वयक विधानसभा प्रभारी, रवी ओलालवार माजी जिल्हा परिषद अध्यक्ष, बंगाली आघाडी अध्यक्ष सुरेश शहा, जिल्हा महामंत्री मधुकर भांडेकर, तालुका महामंत्री बंडू झाडे, विवेक बैस,यश गण्यारवार, टिकाराम गावतूरे, यशवंत झरकर पदाधिकारी व कार्यकर्ते हजर होते.

लोकसभा निवडणुकीपूर्वी ही अशाच प्रकारे खोट्या सह्यांची मोहीम राबवून आपल्याच पक्षाची फसवणूक जिल्ह्यातील काही आपल्याच नेत्यांनी केली आहे त्याचा परिणामही आपल्याला लोकसभा निवडणुकीत दिसून आला आहे. मूळ भाजपा विरोधी मानसिकता असलेल्या काही पदाधिकाऱ्यांनी पुन्हा विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी अशीच रणनीती तयार केली असून त्या माध्यमातून काँग्रेस व विरोधी पक्षाच्या लोकांना ताकद देण्याचे काम सुरू आहे त्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या पक्षाच्या विचाराच्या लोकांनी अशा खोट्या व बेजबाबदार असणाऱ्या पदाधिकाऱ्यांच्या आमिषाला भुलथापांना बळी न पडता तटस्थ उभे रहावे व त्याचा कडाडून विरोध करावा असे आवाहनही या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आमदार डॉ. देवराव होळी यांनी केले आहे.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button