जाहिरात
आपला जिल्हा

शांताबाई निंबोरकर यांच्या मृत्यूपश्चात नेत्रदान करून कुटुंबाने पूर्ण केली आईची इच्छा

तेरवीचा खर्च सामाजिक संघटनाना देणार

Spread the love

लोकशाही न्युज, गडचिरोली (दि. १९ एप्रिल )

आपण हे जग सोडून गेल्यावरही आपले डोळे कोणाच्या तरी आयुष्यातील अंधार दूर करू शकतील,’ ही उदात्त भावना उराशी बाळगून स्वतः नेत्रदानाचा संकल्प करणाऱ्या शांताबाई नानाजी निंबोरकर (वय ८२) यांचे शनिवारी (दि. १८) वृद्धापकाळाने निधन झाले. आईच्या पश्चात असलेल्या या संकल्पनेला त्यांच्या मुलांनी पूर्णत्वास नेले. आता त्या देहरूपाने जगात नसल्या तरी नेत्ररूपी आठवणी उरल्या आहेत.

शांताबाई यांनी आपल्या हयातीतच नेत्रदानाची इच्छा व्यक्त केली होती. त्या स्वतः अतिशय पुरोगामी विचारांच्या होत्या. १८ रोजी दुपारी ३ वाजताच्या सुमारास त्यांचे निधन झाल्यानंतर, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे प्रादेशिक सचिव तथा निवृत्त शिक्षक विलासराव निंबोरकर व भावंडांनी विलंब न लावता जिल्हा रुग्णालयाच्या नेत्र विभागाला संपर्क केला.मृतक शांताबाई निंबोरकर यांचे नेत्रदान केले.

शांताबाई यांच्या पश्चात चार मुले, दोन मुली, चार सुना आणि नातवंडे असा मोठा परिवार आहे. सर्वांनी शांताबाईंच्या इच्छेचा मान राखत या कार्याला पाठिंबा दिला. त्यांच्या पार्थिवावर रविवारी (दि. १९) सकाळी ११ वाजता काठाणी नदीच्या तीरावर अंत्यसंस्कार करण्यात पार पडले .

माणसाने मृत्यूनंतरही कोणाच्या तरी कोणाचे तरी आयुष्य सावरत असेल, तर कामी यावे, आपल्या अवयवामुळे जीवन सार्थकी लागते, असा विचार शांताबाई निंबोरकर नेहमी मांडायच्या. त्यांच्या संकल्पामुळे दोन अंध व्यक्तींच्या आयुष्यात पुन्हा प्रकाशाचे किरण दिसणार आहेत.

तेरवीचा खर्च सामाजिक संघटनाना देणार
!!
शांताबाई नानाजी निंबोरकर यांच्या निधनानंतर त्यांच्या तेरवी, चौदावी व इतर कार्यक्रमाला येणारा खर्च न करता तो कुटुंबीयांनी सामाजिक संघटनाना देण्याचा संकल्प केला आहे.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button