जाहिरात
क्राईम

गडचिरोली : जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्यावर लैंगिक छळ, भ्रष्टाचार, विनयभंग चे गंभीर आरोप

कारवाईसाठी राष्ट्रीय मानवाधिकार महिला आघाडी आक्रमक

Spread the love

लोकशाही न्युज,गडचिरोली, (दि.२० एप्रिल)

गडचिरोली येथील कार्यरत असलेले विद्यमान जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रताप शिंदे यांच्या कार्यपद्धती व वर्तनाबाबत गंभीर स्वरूपाच्या तक्रारी समोर आल्या असून, याबाबत तात्काळ चौकशी करून कठोर कारवाई करण्याची मागणी राष्ट्रीय मानवाधिकार महिला आघाडी च्या वतीने करण्यात येत आहे.

डॉ. सुजिता वाडीवे यांना संबंधित जिल्हा आरोग्य अधिकाऱ्याने प्रभारी जिल्हा हिवताप अधिकारी व तालुका हिवताप अधिकारी कुरखेडा यांना भ्रष्टाचार करण्यासाठी प्रवृत्त करणे विनयभंग, लैंगिक छळ, मानसिक छळ,जातीवाचक अपमान,खोटी माहिती व बनावट कागदपत्रे सादर करणे व इत्यादी अन्यायकारक वागणूक मिळाल्याची तक्रार करण्यात आली आहे. तशी रीतसर तक्रार डॉ. सुजिता वाडीवे यांनी संबंधित वरिष्ठ अधिकारी यांना केली आहे या प्रकरणात अधिकारांचा दुरुपयोग, पक्षपाती निर्णयप्रक्रिया व शासकीय नियमांचे उल्लंघन झाल्याचा आरोप केला आहे.

सदर विषयाची सखोल चौकशी करून जिल्हा आरोग्य अधिकारी प्रताप शिंदे यांच्यावर कारवाई करावी व फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी आधीच डॉ. सुजिता वाडीवे यांनी केली आहे.

राष्ट्रीय मानवाधिकार संघटना, जिल्हा शाखा गडचिरोली (महिला आघाडी) यांच्या वतीने या प्रकरणाची स्वतंत्र, निष्पक्ष व सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच, चौकशी पूर्ण होईपर्यंत संबंधित अधिकाऱ्याला पदावरून दूर करण्याचीही मागणी राष्ट्रीय मानवाधिकार संघटना प्रदेश महिला आघाडी यांनी केली आहे.तसेच संघटनेच्या वतीने असेही सांगण्यात आले आहे की, दोष सिद्ध झाल्यास संबंधित अधिकाऱ्यावर कडक शिस्तभंग व कायदेशीर कारवाई करण्यात यावी, तसेच पीडितेला न्याय मिळवून देण्यासाठी आवश्यक ती सर्व मदत प्रशासनाने करावी.

जर प्रशासनाने तात्काळ कारवाई केली नाही, तर हा प्रश्न राज्य मानवाधिकार आयोग व राज्य महिला आयोग तसेच न्यायालयाच्या निदर्शनास आणण्यात येईल, तसेच लोकशाही मार्गाने लवकरच जिल्हा परिषद समोर आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही संघटनेने दिला आहे.

सदर विषयाची तक्रार राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेच्या वतीने मनीषा पाटणकर – म्हैसकर (acs -home ) गृह विभाग महाराष्ट्र राज्य यांना राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेच्या तक्रार निवेदन देण्यात आले यावेळी राष्ट्रीय मानवाधिकार संघटना जिल्हाध्यक्ष मनीषा मडावी, जाहेदा शेख कोषाध्यक्ष,स्नेहा मेश्राम शहर अध्यक्ष, भूषणा खेडेकर शहर उपाध्यक्ष, राणी गोपशेट्टीवर शहर सचिव उपस्थित होते.

डॉ. प्रताप शिंदे जिल्हा आरोग्य अधिकारी!!

सर्व आरोप पूर्णपणे असत्य, काल्पनिक आणि प्रशासकीय सूडबुद्धीने प्रेरीत आहेत. मी या सर्व आरोपांचे ठामपणे खंडन करतो. माझ्या स्वच्छ प्रतिमेला मलिन करण्यासाठी आणि शासकीय कामात अडथळा आणण्यासाठी हे षडयंत्र रचले गेले आहे.खोटी तक्रार करून शासनाची दिशाभूल करणाऱ्या आणि विभागाची प्रतिमा मलिन करणाऱ्यांविरुद्ध मी मानहानीचा खटला दाखल करण्याची प्रक्रिया देखील सुरू करत आहे.

 

 

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button