जाहिरात
आपला जिल्हा

आदिवासी महिलांच्या सक्षमीकरणासाठी १०० कोटींचे बजेट

मंत्री डॉ. अशोक उईके यांची पत्रकार परिषदेत माहिती

Spread the love

लोकशाही न्युज, गडचिरोली (दि. २६ एप्रिल)

भारतीय जनता पार्टीच्या आदिवासी मोर्चाच्या वतीने गडचिरोली कॉम्प्लेक्स परिसरातील सर्किट हाऊस येथे आयोजित पत्रकार परिषदेत (दि. २५ एप्रिल) आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासाबरोबरच पक्षीय संघटन बळकटीकरणावर विशेष भर तसेच महिलांना रोजगार समक्ष बनवण्यासाठी तसेच त्यांच्या सक्षमीकरणासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी आदिवासी विकास विभागासाठी १०० कोटीचे बजेट दिले असल्याची माहिती राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांनी दिली आहे.

विदर्भासह राज्यातील आदिवासी समाज बांधवांमध्ये जनजागृती करण्यासाठी तसेच मानवी हक्काचे संरक्षण व संवर्धनासाठी १५ नोव्हेंबर पासून भगवान बिरसा मुंडा जयंती निमित्त देशात जनजातीय गौरव दिन म्हणून वर्षभर पंचसूत्र कार्यक्रम भारतीय जनता पार्टी आदिवासी मोर्चा महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने राबविण्यात येत आहे.

या पत्रकार परिषदेला आदिवासी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष व माजी आमदार डॉ. देवराव होळी, आमदार डॉ. मिलिंद नरोटे, भाजपा जिल्हाध्यक्ष रमेश बारसागडे, माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी, आदिवासी मोर्चा जिल्हाध्यक्ष डॉ. नितीन कोडवते यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मंत्री डॉ. अशोक उईके यांनी आपल्या मार्गदर्शनात आदिवासी समाजाच्या विकासासाठी शासन कटिबद्ध असल्याचे स्पष्ट केले. शिक्षण, आरोग्य, पायाभूत सुविधा तसेच विविध शासकीय योजनांचा लाभ तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी कार्यकर्त्यांनी सक्रिय राहण्याचे आवाहन त्यांनी केले.यावेळी जिल्ह्यातील संघटनात्मक कामकाजाचा आढावा घेण्यात आला. आगामी कार्यक्रम, प्रलंबित प्रश्न आणि विकासकामांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. आदिवासी समाजाशी थेट संवाद वाढवून पक्षीय संघटन मजबूत करण्यावर आणि शासन योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यावर उपस्थित मान्यवरांनी भर दिला.
या पत्रकार परिषदेतून आदिवासी भागात पक्षाची संघटन वाढ आणि जनसंपर्क अधिक प्रभावी करण्याचा स्पष्ट निर्धार व्यक्त करण्यात आला.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button