जाहिरात
देसाईगंज/वडसा

बाल गणेश मंडळाच्या २४ सदस्यांनी केले रक्तदान

Spread the love

लोकशाही न्युज,देसाईगंज (दि,१५ सप्टेंबर) प्रतिनिधी:प्रियंका ठाकरे

१४ सप्टेंबर रोजी मौजा गांधीनगर तालुका देसाईगज येथील सार्वजनिक बाल गोपाल गणेश उत्सव मंडळ गांधीनगर यांच्या वतीने आरोग्य तपासणी शिबीर तसेच रक्तदान शिबीर आयोजन करण्यात आले.

तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र येथिल संपूर्ण चमु व जिल्हा शल्यचिकीत्स गडचिरोली ची चमु हजर झाल्याने शिबिराचे उदघाटक सपना धाकडे सरपंच ग्रा.पं.गांधीनगर, नेताजी सोंदरकर उपसरपंच, रामदास मसराम कांग्रेस नेते वडसा व सर्व ग्रामपंचायत सदस्य पोलीस पाटील तमुअ अध्यक्ष त्याचप्रमाणे गावातील प्रतिष्टीत नागरिक उपस्थित होते. त्यामध्ये २४ सदस्यांनी रक्तदान केले व ४०० ते ५००  नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली.

रक्तदान आरोग्य शिबिराच्या यशस्वितेसाठी मंडळाचे अध्यक्ष विनोद चंडिकार सचिव नवनाथ भुरके गोपाल वाढई. रवींद्र दोनाडकर. अविनाश दोनाडकर. जयेश धांडे. अक्षय चंडिकार. रवींद्र मोहुर्ले. दिवाकर कडवे. विकास दोनाडकर. प्रफुल ढोरे. वैभव मेश्राम. अजय मोहुर्ले. रोशन घोरमोडे. राकेश घोरमोडे. राहुल नखाते. कालिदास गुरनुले. सुरेश आदे. समीर दोनाडकर.जयपाल भुरके चंद्रपाल भुरके हनुमान गेडाम.नंदलाल मेश्राम अंकोश वकेकार अमोल अनोले राहुल गेडाम आणि गणेश मंडळाचे सर्व सदस्य गण उपस्थित होते शिबीर यशस्वी रित्या पार झाल्या बद्दल  सुरेश आदे यानी आरोग्य चमु जिल्हा शल्यचिकीत्सक गडचिरोली व शिबीराला उपस्थित झालेले सर्व पदाधिकारी व रक्तदान करणारे सर्व सदस्य यांचे मंडळाच्या वतिने आभार मानण्यात आले.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button