गडचिरोली: आप” पार्टी च्या वतीने अरविंद केजरीवाल यांच्या सुटकेचा जल्लोष

लोकशाही न्युज, गडचिरोली (दि,१४ सप्टेंबर)
गडचिरोली शहरातील आम आदमी पार्टी चे राष्ट्रीय संयोजक तथा दिल्ली चे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची तिहाड तुरुंगातुन मुक्तता होताच आप चे जिल्हा संयोजक बाळकृष्ण सावसाकडे यांचे नेतृत्वाखाली शासकीय विश्रामगृह ते इंदिरा गांधी चौक गडचिरोली येथून बँड च्या साहाय्याने मिरवणूक काढून दुपारी २ वाजता रॅली काढून जल्लोष साजरा करण्यात आला.
केंद्र सरकारच्या इशाऱ्यावर दडपशाही धोरण, हेतुपुरस्पर,द्वेषभावनेतून ईडी ,सीबीआय यांच्यावर दबाव टाकून तुरुंगात ठेवण्यात आले होते.केजरीवाल एकूण १७७ दिवस तुरुंगात राहून सर्वोच्च न्यायालयाने जामीन वर सुटका करण्यात आले ” जेल के ताले तुट गये केजरीवाल छूट गये” अरविंद केजरीवाल जिंदाबाद, आम आदमी पार्टी जिंदाबाद अश्या घोषणा देत कार्यकर्त्यांना गुलाल लाऊन लाडू चे कार्यकर्त्याना, जनतेला वाटप करण्यात आले.
या जल्लोष प्रसंगी जिल्हा सचिव भास्कर इंगळे,ओबीसी आघाडी अध्यक्ष संतोष कोटकर,महिला आघाडी आघाडी मिनाक्षी खरवडे, सेवानिवृत्त शिक्षक आघाडी अध्यक्ष जाणिकराव ननावरे,महिला संघटनमंत्री दीपिका गोवर्धन, महामंत्री शत्रूघनजी ननावरे,महिला शहर अध्यक्ष प्रीती लेनगुरे, फायर आघाडी अध्यक्ष केशव सातपुते, कामगार आघाडी अध्यक्ष दिवाकर साखरे, गडचिरोली तालुका अध्यक्ष अचित ठाकूर, शेतकरी नेते महागु पिपरे, युवा संघटनमंत्री प्रेम धोबे,युवा महामंत्री संतोष कोडापे,जेष्ठ कार्यकर्ते तुळशीराम मोहूर्ले, अविनाश आत्राम,स्वप्नील सूर्यवंशी,पंकज नैताम, विजय भेंडारे,विजय कत्रोजवार,अमोल गावतुरे,अरविंद बावणे,रुपेश पोहनकर, योगेश भोयर, रविंद्र दाणे, ऋषी चौधरी पदाधिकारी व कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.
