महिलेचा विनयभंग करणा-या आरोपीला ३ महीने कारावास व २ हजार दंड

लोकशाही न्युज, अहेरी/एटापल्ली (दि,१३ सप्टेंबर)
मा. अतिरिक्त सत्र न्यायाधीश, अहेरी आर. एन. बावनकर यांचा निर्णय
संडास साठी गेलेल्या माडिया गोंड जातीतील महिलेला एकटी असल्याचे साधून आरोपी जगन्नाथ शिवकुमार बैरागी (वय ३६ वर्ष) मु. पंदेवाही ता. एटापल्ली जि. गडचिरोली याने दिनांक २४/१०/२०१७ ला सायंकाळी ६ वाजे दरम्यान तिचे हात तोंड दाबून विनयभंग केला.
फिर्यादीने आरोपी विरोधात एटापल्ली पोलीस स्टेशनमध्ये लेखी तक्रार केली होती त्या अनुषंगाने तपास केला आरोपी दोषी आढळून आला.
अप क्र ३६/२०१७ कलम ३४१.३५४ भादवी तसेच ३(२) (V)३(१) (w) (I)(II) अट्रोसिटी अन्वये गुन्हा दाखल करून आरोपी विरुध्द सबळ पुरावा मिळून आल्याने दोषारोपपत्र तयार करुन सेशन कोर्टात दाखल केले.
मा. अतिरिक्त सत्र न्यायालय अहेरी याने स्पेशल केस क्रमांक २१/२०२३ मध्ये साक्ष पुरावे घेतले असता फिर्यादी व साक्षीदार १३/९/२०२४ रोजी आरोपी जगन्नाथ शिवकुमार बैरागी (वय ३६ वर्ष) वर कलम ३५४ भादवी मध्ये ३ महीने कारावास २ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली.
सरकारी पक्षातर्फे सरकारी वकील एन. एम. भांडेकर यांनी कामकाज पाहीले तसेच गुन्हयाचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी, एटापल्ली शशिकांत भोसले यांनी केला.
