जाहिरात
आपला जिल्हा

१४ सप्टेंबरला गडचिरोलीत माळी समाज मेळावा तर चामोर्शी येथे ढीवर ,भोई व केवट समाज मेळावा

मेळाव्याला हजर रहावे आमदार डॉ. होळी

Spread the love

लोकशाही न्युज, गडचिरोली/चामोर्शी (दि.१२ सप्टेंबर) 

 

समाज बांधव व आमदार डॉ. देवराव होळी मित्र परिवाराच्या वतीने दिनांक १४ सप्टेंबर रोजी चामोर्शी येथे सकाळी ११ वाजता ढिवर,भोई व केवट समाजाचा तर गडचिरोली येथे दुपारी २ वाजता माळी समाज बांधवांचा मेळावा आयोजित करण्यात आला असून या मेळाव्याला समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन समाज बांधव व आमदार डॉ. देवराव होळी मित्र परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.

ढिवर,भोई व केवट समाजाचा मेळावा चामोर्शी येथे सकाळी ११ वाजता तेली समाजसभागृह बस स्थानक चामोर्शी येथे आयोजित करण्यात आला असून याच दिवशी दुपारी २ वाजता गडचिरोली येथील गानली सभागृहामध्ये माळी समाजाचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यामध्ये गुणवंत विद्यार्थी व नवनियुक्त कर्मचारी अधिकारी यांचा सत्कार करण्यात येणार आहे.तरी या मेळाव्याला मोठ्या संख्येने समाज बांधवांनी उपस्थित रहावे असे आवाहन समाज बांधव व आमदार डॉ. देवराव होळी मित्र परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button