
लोकशाही न्युज, गडचिरोली (दि,१२ जानेवारी)
१४ जानेवारी ला गडचिरोली शहरातील धानोरा रोड वरील महाराजा लॉन येथे महायुतीचा महामेळावा होईल अशी माहिती आज झालेल्या कॉम्प्लेक्स परिसरातील सर्किट हाऊस येथे खासदार अशोक नेते यांच्या नेतृत्वातील झालेल्या पत्रकार परिषदेतून देण्यात आली.
संकल्प महाविजय – २०२४ महायुतीच्या प्रदेश नेतृत्वाच्या सुचनेनुसार व प्रदेश स्तरावरील ठरल्याप्रमाणे गडचिरोली येथे १४ जानेवारीला जिल्हा स्तरावर कार्यकर्ता महामेळावा होईल.
पत्रकार परिषदेला गडचिरोली -चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोक नेते, गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ.देवराव होळी, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे, राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष रविंद्र वासेकर, भाजपा लोकसभा समन्वयक प्रमोद पिपरे, शिवसेना संपर्क प्रमुख हेमंत जंम्बेवार, आर.पी.आय.गटाचे मुनिश्वर बोरकर,आर.पी.आय (आठवले) गटाचे घुटके,किसान आघाडी मोर्चा चे प्रदेश सरचिटणीस रमेश भुरसे,भाजपा जिल्हा महामंत्री प्रकाश गेडाम,जिल्हा महामंत्री योगीता पिपरे, जिल्हा महामंत्री सदानंद कुथे,भाजपा महिला मोर्चा च्या जिल्हाध्यक्षा गिता हिंगे,राष्ट्रवादी काँग्रेस युवा कमेटीचे जिल्हाध्यक्ष लीलाधर भरडकर, अमीता मडावी,निता वडेट्टीवार, भानारकर हे हजर होते.
